For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम ऑफ द टूर्नामेंटच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

06:45 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम ऑफ द टूर्नामेंटच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा
Advertisement

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात सात भारतीय : अफगाणच्या खेळाडूंनाही स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसी टी 20 वर्ल्डकपचा थरार आता संपला आहे. शनिवारी टीम इंडियाने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत टी 20 वर्ल्डकपवर आपली मोहोर उमटवली. वर्ल्डकप संपताच आयसीसीने टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे. आयसीसीने नुकतेच 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंटची‘ घोषणा केली आहे. या टीममध्ये टीम इंडियाचे सहा खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय, अफगाणच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात 76 धावांची धमाकेदार खेळी साकारणाऱ्या विराट कोहलीला मात्र या संघात स्थान मिळालेले नाही.

Advertisement

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज यांची या संघात सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 8 सामन्यात 156 च्या स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या असून, गुरबाजने 124 च्या स्ट्राईक रेटने 281 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव आणि मार्कस स्टॉयनिस यांचा मधल्या फळीत समावेश करण्यात आलाय. तसेच भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही संघात स्थान मिळाले आहे. त्याने स्पर्धेत 144 धावा करण्यासोबतच 11 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

भारताचा अक्षर पटेल आणि अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान यांची आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये फिरकीपटू म्हणून निवड झाली आहे. याशिवाय, संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि फजलहक फारुकी यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. अर्शदीप सिंग आणि फजलहक फारुकी यांनी या स्पर्धेत सर्वाधिक (17) विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहनं 15 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा एका खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही. बारावा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी टी 20 विश्वचषक टीम ऑफ द टूर्नामेंट -

रोहित शर्मा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारुकी, अॅनरिक नोर्तजे (12वा खेळाडू).

Advertisement
Tags :

.