For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाला 27 पदके

06:35 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाला 27 पदके
Advertisement

वृत्तसंस्था / कर्नाल (हरियाणा)

Advertisement

थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करताना एकूण 27 पदकांची कमाई केली. यामध्ये 4 सुवर्ण, 10 रौप्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील नितीश कुमारने 3 सुवर्णपदके मिळविली.

थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी एसएल-3-एसएल-4 विभागात नितीश कुमार आणि सुकांत कदम यांनी अंतिम सामन्यात आपल्याच देशाच्या जगदीश डीली आणि नविन शिवकुमार यांचा 21-17, 11-21, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. याच प्रकारात भारताने कांस्यपदकही घेतले. भारताच्या मोहम्मद अन्सारी आणि अभिजित सखुजा या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या एसएल-3 एकेरीमध्ये नितीश कुमारने सुवर्णपदक मिळविताना इंडोनेशियाच्या इम्रानचा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. मिश्र दुहेरीच्या एसएल-3-एसयु-5 या गटात नितीशकुमार आणि तुळशीमती मुर्गेसन यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देताना आपल्याच देशाच्या ऋत्विक रघुपती आणि मानसी जोशी यांचा पराभव केला

Advertisement

Advertisement
Tags :

.