For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडात भारतीय वंशाच्या युवकाची हत्या

06:34 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनडात भारतीय वंशाच्या युवकाची हत्या
Advertisement

भररस्त्यावर झाडण्यात आली गोळी

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हँकुव्हर

कॅनडामध्ये भारतीय वंशाचा युवक दिलराज सिंह गिल याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या टार्गेटेड गँगवारचा परिणाम असू शकते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यावर आम्ही गिलचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Advertisement

गोळीबाराच्या घटनेनंतर बक्सटन स्ट्रीटच्या 5000 ब्लॉकमध्ये एका वाहनाला आग लागली होती. गोळीबाराशी या घटनेचा संबंध असू शकतो का हे तपासले जात असल्याचे ब्रिटिश कोलंबियाच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. गिलचे नाव अनेक प्रकरणांमध्ये संशयित आरोपी म्हणून सामील होती. गोळीबाराचा संबंध बीसी गँग वादाशी असावा असे मत पोलिसांनी व्यक्त केली आहे. गिलच्या हत्येप्रकरणी इंटीग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीम तपास करत आहे.

Advertisement
Tags :

.