युएईत भारतीय वंशाचा डॉक्टर विमान दुर्घटनेत ठार
दुबई :
संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) रस अल खैमाहच्या किनाऱ्यावर एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून यात भारतीय वंशाचे 26 वर्षीय डॉक्टर आणि पाकिस्तानी महिला वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत जीव गमाविणारे डॉक्टर सुलेमान अल मजीद हे युकेच्या काउंटी डरहॅम अँड डर्लिंग्टन एनएचएस फौंडेशन ट्रस्टमध्ये कार्यरत होते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली पाकिस्तानी वैमानिक देखील 26 वर्षांची होती. संबंधित विमान हे प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवासासाठी भाडेतत्वावर घेतले हेते. कोव रोटाना हॉटेलनजीक विमान उ•ाणाच्या काही क्षणातच कोसळले होते. डॉक्टर सुलेमान यांचे पिता मजीद मुकर्रम आणि परिवाराचे सदस्य उ•ाण पाहण्यासाठी क्लबमध्ये उपस्थित होते. जखमी दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले होते, जेथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. युएईच्या नागरी उ•ाण संघटनेने याप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे.