इराणच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन सैनिकाचा मृत्यू
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार जॉर्डनमधील एका तळावर इराणने केलेल्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन सैनिक एंजेला रामप्रसाद यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. 25 वर्षीय आर्मी सार्जंट एंजेला 17 जुलै रोजी जॉर्डनच्या मुवाफक साल्टी एअर बेसवर इराणने केलेल्या हल्ल्यादरम्यान मृत्युमुखी पडल्या आहेत. एंजेला यांना प्रथम बेपत्ता घोषित करण्यात आले होते आणि नंतर त्यांच्या स्थितीला ‘ड्युटी स्टेट्स- ठिकाण अज्ञात’ आणि मृत मानण्यात बदलण्यात आले होते. एंजेला रामप्रसाद या गयाना येथून आलेल्या भारतीय समुदायाशी संबंधित होत्या. त्यांचे पिता स्थानिक डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बासदेव रामप्रसाद आहेत. एंजेला या न्यूयॉर्क शहराच्या क्वीन्स बरो येथील ओझोन पार्क भागातील रहिवासी होत्या, तेथे भारतीय वंशाच्या गयानावासीयांचा एक मोठा समुदाय राहतो असे पेंटागॉनकडून सांगण्यात आले. एंजेला 10 व्या आर्मी अँड मिसाइल डिफेन्स कमांडमध्ये कार्यरत आणि जॉर्डनमध्ये तैनात होत्या.