For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडियन खुली स्क्वॅश स्पर्धा ब्रेबॉर्नमध्ये

06:01 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडियन खुली स्क्वॅश स्पर्धा ब्रेबॉर्नमध्ये
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

येथील प्रख्यात असलेल्या सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 18 ते 22 मार्चदरम्यान 2026 सालातील इंडियन खुली स्क्वॅश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सदर स्पर्धा येथील मुंबई जिमखाना येथे यशस्वीपणे भरविण्यात आली होती.

सदर स्पर्धेला व्यावसायिक स्क्वॅश संघटनेकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. भारतातील व्यावसायिक स्क्वॅश क्षेत्राला या स्पर्धेमुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. सदर स्पर्धेत विद्यमान महिला गटातील विजेती अनाहत सिंगचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत रमित टंडन, अभय सिंग, वीर छोत्रानी, व्ही. सेंथीलकुमार, जोश्ना चिन्नप्पा, याह्या एल्नावासनी, हॅना मोअताझ, मॅझेन हेशम हे स्क्वॅशपटू सहभागी होत आहेत.

Advertisement

या स्पर्धेत यावेळी पुरूष आणि महिला विभागातील विजेत्यांना प्रत्येकी 44,500 डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्क्वॅशपटू सहभागी होणार असल्याने सदर स्पर्धेला विश्व दर्जा लाभला आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने पूर्ण ग्रासकोर्टवर खेळविले जातील.

Advertisement
Tags :

.