For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडियन ऑईल निर्यात वाढविण्याच्या तयारीत

06:22 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडियन ऑईल निर्यात वाढविण्याच्या तयारीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इंडियन ऑइल आफ्रिकन आणि युरोपीय बाजारपेठांमध्ये पेट्रोकेमिकल निर्यात वाढवण्याची योजना आखत आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी)चे सीएमडी एएस साहनी यांनी दिली. संबंधीत क्षमतेच्या विस्तारादरम्यान पेट्रोकेमिकल निर्यातीसाठी आफ्रिका आणि युरोप महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास येतील अशी अपेक्षा साहनी यांनी व्यक्त केली आहे.

देशातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणून इंडियन ऑईल कार्यरत असून, ज्याची एकूण वार्षिक क्षमता 8.07 कोटी टन (एमएमटीपीए) आहे. ती प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करते, तर निर्यातीतून त्याच्या विक्रीचा फक्त एक छोटासा भाग मिळतो. 2028 पर्यंत रिफायनरीची क्षमता दरवर्षी 9.84 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

भारत रिफायनरी क्षमता वाढवतोय

साहनी म्हणाले, ‘भारत आपली रिफायनरी क्षमता वाढवत आहे. मी क्षमता सुमारे 1.8 कोटी टनांनी वाढवीन, म्हणजे विस्तारित रिफायनिंग क्षमतेपैकी 40 टक्के इंडियन ऑइलमधून येईल. देशांतर्गत (इंधन वापर) 4-5 टक्क्यांनी वाढत आहे. आपल्याला निर्यातीवर, विशेषत: डिझेलवर लक्ष केंद्रित करावे लागेल. पहिल्या सहा महिन्यांत, आयओसीच्या एकूण विक्रीत निर्यातीचा वाटा फक्त 5.5 टक्के होता.  कंपनी 2030 पर्यंत आपली पेट्रोकेमिकल उत्पादन क्षमता 43 लाख टन प्रतिवर्षावरून 1.3 कोटी टन करण्याची योजना आहे. इंडियन ऑइलला कच्च्या तेलाच्या स्त्राsतांमध्ये विविधता आणण्याचे प्रयत्न असणार आहेत.

Advertisement
Tags :

.