For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

06:38 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारतीय अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
Advertisement

अमेरिकन आरोपपत्रात हत्येसाठी एजंट नेमल्याचा दावा : भारत उच्चस्तरीय समितीकडून करणार चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, न्यूयॉर्क

अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी न्यूयॉर्क पोलिसांचे आरोपपत्र समोर आले आहे. यामध्ये निखिल गुप्ता या भारतीय नागरिकावर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. एका भारतीय सीआरपीएफ अधिकाऱ्याने त्याला पन्नूच्या हत्येची योजना करण्यास सांगितल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Advertisement

भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील शीख फुटीरतावादी नेत्याच्या (पन्नू) हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. निखिल गुप्ता याने एका शीख फुटीरतावाद्याच्या हत्येसाठी एका व्यक्तीला कंत्राट दिले होते. 30 जून रोजी निखिल गुप्ता झेक प्रजासत्ताक येथे गेला असता त्याला अटक करण्यात आली. एका भारतीय सरकारी कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून निखिल गुप्ता हा काम करत होता, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून निखिल गुप्ताने पन्नूच्या हत्येसाठी एका गुन्हेगाराशी संपर्क साधला, पण प्रत्यक्षात तो अमेरिकन एजंट होता. या एजंटने निखिलची ओळख दुसऱ्या एका गुप्तहेर अधिकाऱ्याशी करून दिली. यासाठी सुमारे 83 लाख ऊपयांमध्ये सौदा झाला होता, असे नुकतेच समोर आलेल्या आरोपपत्रात नमूद असल्याचे समजते.

उच्चस्तरीय समिती स्थापन : परराष्ट्र मंत्रालय

न्यूयॉर्क पोलिसांचे आरोपपत्र उघड झाल्यानंतर गुऊवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात एका भारतीय अधिकाऱ्याच्या सहभागाची आम्ही चौकशी करत आहोत. यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून ती भारत सरकारच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित गुन्हेगारी, तस्करी आणि शस्त्रधारी दहशतवादी यांच्यातील संबंध ही भारतीय एजन्सींसाठीही गंभीर समस्या आहे. याची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने 18 नोव्हेंबर रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. तपासाच्या निकालाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

माजी सीआरपीएफ अधिकारी निखिल गुप्ताच्या संपर्कात

आरोपपत्रानुसार, निखील गुप्ताच्या संपर्कात असलेला भारतीय अधिकारी केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजेच ‘सीआरपीएफ’मध्ये काम करत होता. मात्र त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्याला ‘सीसी-1’ असे संबोधण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थापन आणि गुप्तचरांसाठी जबाबदार असलेले वरिष्ठ क्षेत्र अधिकारी म्हणून अशी त्याची ओळख दाखविण्यात आली आहे. त्याने आर्ट ऑफ वॉरचे अधिकारी स्तरावरील प्रशिक्षण घेतले असून त्याला शस्त्रे वापरण्यासही शिकवले गेल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

हत्येसाठी अमेरिकन एजंटशी करार

भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून निखिल गुप्ताने पन्नूच्या हत्येसाठी एका गुन्हेगाराशी संपर्क साधला, पण प्रत्यक्षात तो अमेरिकन एजंट होता. या एजंटने निखिलची ओळख दुसऱ्या गुप्त अधिकाऱ्याशी करून दिली, ज्याने हत्येची चर्चा केली. पन्नूच्या हत्येसाठी सुमारे 83 लाख ऊपयांचा सौदा झाला होता. करारानंतर भारतीय अधिकारी ‘सीसी-1’ने गुप्ताला पन्नूच्या न्यूयॉर्कमधील घराचा पत्ता, त्याचा फोन नंबर आणि दैनंदिन दिनचर्येशी संबंधित संपूर्ण माहिती पुरविल्याचा दावाही करण्यात आला आहे. आरोपपत्रात पन्नूच्या हत्येसाठी आगाऊ पैसे दिल्याचाही उल्लेख आहे. तसेच हत्येचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले. मात्र, भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू असतानाच्या कालावधीत हत्या करू नये, असेही सांगण्यात आले होते.

झेक प्रजासत्ताकमधून निखिल गुप्ताला अटक

अमेरिकन न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निखिल गुप्ताला झेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांनी 30 जून रोजी अटक केली होती. प्रत्यार्पण करारानुसार त्याला अमेरिकेत आणण्यात आले. पन्नू व्यतिरिक्त आपल्याला अनेकांना मारण्यास सांगितले होते. या कामाच्या मोबदल्यात त्याच्याविऊद्ध सुरू असलेला खटला बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे पन्नूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला भारतीय नागरिक निखिल गुप्ता याने यूएस फेडरल एजंटना सांगितले.

Advertisement
Tags :

.