For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Navy UAV Drone Crashed नौदलाचे युएव्ही ड्रोन गुजरातमध्ये कोसळले अपघात कसा झाला, याची चौकशी केली जाणार

11:57 PM Jul 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
navy uav drone crashed नौदलाचे युएव्ही ड्रोन गुजरातमध्ये कोसळले अपघात कसा झाला  याची चौकशी केली जाणार
Advertisement

► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय नौदलाचे एक मानवरहित सर्वेक्षण ड्रोन गुजरातमध्ये पोरबंदरनजीक कोसळले आहे, अशी माहिती भारतीय सेनादलांच्या वतीने देण्यात आली आहे. धर्मपूर या खेड्यानजीक ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून तसा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement

हे ड्रोन प्रशिक्षण उड्डाणावर होते. त्यात चालक नसल्याने मानवहानी झालेली नाही. तथापि, यामुळे या ड्रोनच्या तंत्रज्ञानाविषयी शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ड्रोनचा भूमीवरील नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असला, तरी चौकशी पथक सर्व शक्यता गृहीत धरुन तपास करणार असून तसा आदेश नौदलाकडून देण्यात आला आहे.

ड्रोनमध्ये ते आकाशात असताना तांत्रिक दोष त्यात निर्माण झाला असावा, असे अनुमानही काढण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता मात्र निदान सध्याच्या परिस्थितीत फेटाळून लावण्यात आली आहे. हे ड्रोन नौदलात आकाशातून समुद्राचे निरीक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या नौदलाच्या हालचाली टिपण्यासाठी उपयोगी होते. अशी किमान 40 ड्रोन्स नौदलाकडे आहेत. हे ड्रोन ‘दृष्टी-10 स्टारलाईनर’ या प्रकारातील होते.

Advertisement

अपघाताच्या चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केली जाणार असून या समितीत नौदलाचे अधिकारी आणि तंत्रज्ञ यांचा समावेश केला जाईल. समितीला एक महिन्यात अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय सेनेचे ड्रोन अपघातग्रस्त होण्याची ही गेल्या दोन वर्षांमधील प्रथमच वेळ आहे. त्यामुळे कसून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून अहवालाचा अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.