For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष, महिला हॉकी संघांची मोहीम आजपासून

06:42 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष  महिला हॉकी संघांची मोहीम आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)

Advertisement

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघ आज बुधवारपासून एफआयएच प्रो लीगच्या कठीण युरोपीय टप्प्याला सामोरे जाणार असून अर्जेंटिनाविऊद्धच्या सामन्यांनी त्यांची ही मोहीम सुरू होईल. भारतीय पुऊष हॉकी संघ त्यातून पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी त्रुटी दूर करण्याचे ध्येय बाळगून असेल, तर नवीन कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्याच्या निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करेल,

ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील पुऊष संघ ऑस्ट्रेलियाकडून 0-5 असा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश झाल्यानंतर या स्पर्धेत उतरत आहे आणि पॅरिस गेम्सपूर्वी विजयपथावर परत येण्याच्या दृष्टीने युरोपमध्ये मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. ‘नि:संशयपणे आम्ही ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत केले आहे परंतु प्रो लीगचे विजेते बनून 2026 च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळविण्याच्या दृष्टीने शक्य तितके उत्तम प्रयत्न करणेही आवश्यक आहे, असे हरमनप्रीत म्हणाला. त्याचा संघ सध्या आठ प्रो लीग सामन्यांमधून 15 गुणोंसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

नेदरलँड्स 26 गुणांसह (12 सामन्यांतून) आघाडीवर आहे, तर ऑस्ट्रेलियाचे 20 गुण (8 सामन्यांतून) झालेले आहेत. अर्जेंटिनाव्यतिरिक्त भारतीय पुऊष संघ बेल्जियम, जर्मनी आणि ब्रिटनविऊद्ध खेळताना त्यांच्या ऑलिम्पिक तयारीची चाचणी घेईल. दुसरीकडे, प्रो लीगमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने प्रो लीग होम लेगमधील 8 सामन्यांतून आठ गुणांची कमाई केलेली आहे. चीन आठ सामन्यांतून 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर नेदरलँड्स 12 सामन्यांतून सर्व विजयाच्या विक्रमासह 36 गुणांवर आहे. अर्जेंटिनाविऊद्धच्या सामन्यांनंतर महिला संघ 23 रोजी बेल्जियमशी खेळेल.

Advertisement
Tags :

.