भारतीय पुरुष, महिला कंपाऊंड तिरंदाजी संघ अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ शांघाय
भारताच्या पुऊष आणि महिला कंपाऊंड तिरंदाजी संघांनी बुधवारी येथे हंगामाच्या सुऊवातीच्या ह्युंदाई तिरंदाजी विश्वचषकात अंतिम फेरी गाठून देशाचे पदक निश्चित केले आहे. अनुभवी अभिषेक वर्मा, नवोदित प्रथमेश भालचंद्र फुगे आणि विद्यमान 21 वर्षांखालील विश्वविजेता प्रियांश यांचा समावेश असलेल्या चौथ्या मानांकित पुऊष संघाने फिलिपीन्स आणि डेन्मार्कचा पराभव केल्यानंतर दक्षिण कोरियाला धक्का दिला. शनिवारी जेतेपदासाठी त्यांचा नेदरलँड्सशी सामना होईल.
विद्यमान विश्वविजेत्या आणि येथे अव्वल मानांकित असलेल्या भारतीय महिलांची विजेतेपदासाठी इटलीशी लढत होणार आहे. तुर्की आणि एस्टोनियाला पराभूत करून त्यांनी श्रेणीतील आपण आघाडीचा संघ असल्याचे दाखवून दिले. सध्याची 18 वर्षांखालील आणि वरिष्ठ विजेती अदिती स्वामी, आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ज्योती सुरेखा वेन्नम आणि परनीत कौर या त्रिकुटाने दोन सामन्यांतून आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले आहे.
भारतीय पुऊष संघाने कोरियाचा 235-233 अशा प्रकारे दोन गुणांनी पराभव करत मोठा धक्का दिला. ‘आमचा समन्वय चांगला राहिला आणि आम्ही वाऱ्याचा अंदाज चांगल्या प्रकारे बांधला’, असे अभिषेकने कोरियाविऊद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर सांगितले. ‘उपांत्य फेरीत नेहमीच चुरशीचे सामने होतात. आम्ही चांगल्या नेमबाजीसाठी तयार होतो आणि सुवर्णपदकासाठीच्या लढतीत प्रवेश करता आल्याने आम्ही आनंदित आहोत’, असे त्याने सांगितले. कोरियाविऊद्धच्या सामन्यानंतर आनंदित प्रियांशने सांगितले की, बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करताना आपल्याला खूप आनंद झाला. त्यांना आपण आतापर्यंत फक्त सोशल मीडियावर पाहिले होते.
भारतीय महिला संघाने एस्टोनियाचा 235-230 असा पराभव केला आणि अदितीने या कामगिरीचे श्रेय दीर्घकाळापासून चालू असलेल्या प्रक्रियेला दिले. आम्ही आमची नेमबाजी प्रक्रिया कायम ठेवली आणि त्याचे फळ मिळाले आहे, असे तिने सांगितले. मला आशा आहे की, आम्ही गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या विश्वचषकातील यशाची पुनरावृत्ती करू शकू, असेही ती म्हणाली. तिथे भारतीय पुऊष आणि महिला या दोन्ही संघांनी सुवर्णपदके जिंकली होती. अंतिम फेरीतील भारताची प्रतिस्पर्धी असलेल्या इटलीच्या महिला संघाने उपांत्य फेरीच्या शूट-ऑफमध्ये कझाकस्तानवर मात केली, तर पुरुष गटात 10 व्या मानांकित डच संघाने टायब्रेकरवर फ्रान्सविऊद्धची लढत जिंकली.