For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरूष संघ उपांत्यपूर्व फेरीत

06:22 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरूष संघ उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)

Advertisement

येथे सुरू असलेल्या 2026 च्या थॉमस आणि उबेर चषक फायनल्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. सोमवारी झालेल्या अ गटातील सामन्यात माजी विजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. आता भारताचा या गटातील शेवटचा सामना टॉपसिडेड चीनबरोबर होणार आहे. या सामन्यानंतरच अ गटातील पहिले दोन संघ निश्चित होतील.

सोमवारी झालेल्या अ गटातील लढतीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने पहिल्या एकेरी सामन्यात ऑस्टेलियाच्या इब्राहीम स्टीफेन सॅमचा 21-14, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात आयुष शेट्टीने श्रेय धांडवर 21-8, 21-6 अशी मात करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीच्या सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी ऑस्ट्रेलियाच्या रिझेकी हिदायत आणि जॅक यु यांचा 21-14, 21-16 अशा गेम्समध्ये फडशा पाडला. चौथ्या लढतीत भारताच्या एचएस प्रणॉयने ऑस्ट्रेलियाच्या ऋध्षी होंडा भूपतीचा 21-11, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाला 4-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या हरिहरन अंशकरुण आणि एम. आर. अर्जुन यांनी ऑस्ट्रेलियाच्या सॅम व अॅन्डीका यांचा 21-12, 21-10 असा पराभव केल्याने भारतीय पुरूष संघाने ही लढत 5-0 अशी एकतर्फी जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अ गटात चीनने यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा 5-0 तर दुसऱ्या लढतीत कॅनडाचा 4-1 असा पराभव केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.