For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष टेटे संघ उपांत्य फेरीत

06:54 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष टेटे संघ उपांत्य फेरीत
Advertisement

महिला संघ जपानकडून पराभूत, मात्र ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई

Advertisement

वृत्तसंस्था/ अस्ताना

भारतीय पुऊष टेबल टेनिस संघाने बुधवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानवर 3-1 अशी मात करत आशियाई स्पर्धेतील आपले सलग तिसरे कांस्यपदक निश्चित केले. महिलांना उपांत्य फेरीत जपानकडून पराभूत व्हावे लागले असले, तरी त्यांनी ऐतिहासिक कांस्यपदक मिळविल्यानंतर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेतील वरील पदक नोंदले गेले. पुऊषांच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत 60 व्या क्रमांकावर असलेल्या मानव ठक्करने कझाकस्तानचा अव्वल मानांकित खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत 41 व्या स्थानी असलेल्या किरिल गेरासिमेन्कोला 3-0 (11-9, 11-7, 11-6) असे पराभूत करून जबरदस्त धक्का दिला. यामुळे भारताला सुऊवातीलाच आघाडी मिळाली. त्यानंतर कझाकस्तानच्या अॅलन कुरमंगलीयेव्ह (क्रमांक 183) याने हरमित देसाईचा 3-0 (11-6, 11-5, 11-8) असा पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली

Advertisement

भारताचा अनुभवी खेळाडू शरथ कमल याने तिसऱ्या सामन्यात एडोस केन्झिगुलोव्हचा 3-0 (11-4, 11-7, 12-10) असा पराभव करत आगेकूच केल्याने भारताची आघाडी 2-1 अशी झाली. निर्णायक क्षण हरमितने चौथ्या सामन्यात गेरासिमेन्कोचा सामना केला तेव्हा आला. पण डळमळीत सुऊवातीनंतर जागतिक क्रमवारीत 91 व्या स्थानावर असलेल्या हरमितने दुसऱ्या आणि चौथ्या गेममध्ये जोरदार पलटवार करत आक्रमक बॅकहँड्स आणि फोरहँड्सच्या साहाय्याने बाजी मारली. त्याने 3-2 असा विजय मिळवून भारताचे उपांत्य फेरीतील स्थान आणि कांस्यपदक निश्चित केले.

2023 आणि 2021 मधील मागील दोन स्पर्धांतही भारतीय पुऊषांनी कांस्यपदक पटकावले होते. भारताचे आशियाई स्पर्धेतील हे एकूण सातवे पदक आहे. आज गुऊवारी उपांत्य फेरीत भारत चिनी तैपेई किंवा जपानशी खेळेल. दुसरीकडे, महिला संघाला चौथ्या मानांकित जपानविऊद्ध खेळताना विदेशी प्रशिक्षक मॅसिमो कोस्टँटिनीच्या अनुपस्थितीत केलेल्या धोरणात्मक चुकांचा फटका बसला. आश्चर्य म्हणजे अव्वल क्रमांकाची भारतीय महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिलाही बसविण्यात आले. दक्षिण कोरियाविऊद्धच्या लढतीत चमकलेल्या अहिका मुखर्जीने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या मिवा हरिमोटोविऊद्ध चांगली सुऊवात केली, पण महत्त्वाच्या संधींना दवडून सामना 2-3 (8-11, 11-9, 8-11, 13-11, 7-4) असा गमावला.

मनिका बत्राने जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असलेल्या सत्सुकी ओडोवर 11-6, 11-5, 11-8 असा विजय मिळवत बरोबरी साधून दिली, पण जपानची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम पॅडलर मीमा इटोने सुतीर्थ मुखर्जीवर वर्चस्व राखताना 11-9, 11-4, 15-13 असा विजय मिळवून जपानला पुढे नेले. निर्णायक चौथ्या लढतीत बत्रा आपला पूर्वीचा फॉर्म कायम राखू शकली नाही आणि मिवाने 11-6, 6-11, 11-2, 11-3 असा पराभव केला. त्यामुळे भारताच्या स्पर्धेबाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी कांस्यपदक त्यांना प्राप्त झाले.

Advertisement
Tags :

.