भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्ण मिळविण्यास सज्ज
आज जेतेपदासाठी मलेशियाविरुद्ध लढत
वृत्तसंस्था, काकामिगाहारा : आज शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मलेशियाविरुद्ध खेळताना भारतीय पुरुष संघ आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत सुवर्णपदक राखण्यासोबतच 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीही सलग दोनदा सुवर्णपदक जिंकलेले नाही, त्यामुळे शनिवारी होणारा अंतिम सामना इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याची एक सुवर्णसंधी आहे. मात्र कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविऊद्धच्या उपांत्य सामन्यात काहीशा अस्थिर कामगिरीनंतर मलेशियाविऊद्ध खेळताना भारताला आपली कामगिरी अधिक उंचावण्याचे आव्हान पेलावे लागेल. कारण मलेशियाने या स्पर्धेत सलग पाच विजय मिळवत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे.
वास्तविक, दोन्ही अंतिम स्पर्धक आपापल्या उपांत्य सामन्यांमधील कठीण संघर्षानंतरच सुवर्णपदकाच्या लढतीसाठी सज्ज झाले आहेत. गुऊवारी पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले असले, तरी त्यांनी अनेक पेनल्टी कॉर्नर्स वाया घालवले आणि तीन गोलांची आघाडी गमावली. 3-0 अशी आघाडी घेतल्यावर भारताचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण असल्याचे वाटत होते, परंतु पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत गोलसंख्या 3-3 अशी बरोबरीवर आणली. सामना शूटआउटकडे झुकत असतानाच भारताच्या अभिषेकने निर्धारित वेळेच्या शेवटच्या मिनिटात निर्णायक गोल करत 4-3 असा नाट्यामय विजय मिळवून दिला.
तरीही या सामन्यातील पुनरागमनाच्या घटनांवरून भारताला नक्कीच आत्मपरीक्षण करावे लागेल. मागील स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारताला आता बचावात्मक खेळ अधिक मजबूत करावा लागेल आणि पाकिस्तानला सामन्यात परतण्याची संधी देताना जशा छोट्या चुका केल्या गेल्या तशा त्या टाळाव्या लागतील. उपांत्य सामना आणि सुवर्णपदकाची लढत यांच्यात केवळ एका दिवसाचे अंतर असल्याने खेळाडूंचे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरणे आणि इतर बारकाव्यांकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, मलेशियालाही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. दक्षिण कोरियाने त्यांना कडवी झुंज दिली, परंतु अखेरीस संयम राखत त्यांनी 2-1 असा विजय मिळवला. या निकालामुळे त्यांना आशियाई खेळांतील गेल्या तीन स्पर्धांमध्ये दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळाले आणि अत्यंत चुरशीच्या परिस्थितीतही शांत राहण्याची त्यांची क्षमता अधोरेखित झाली.