For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष हॉकी संघ चीनला रवाना

06:07 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष हॉकी संघ चीनला रवाना
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

2024 च्या पुरूषांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरूष हॉकी संघाने चीनला प्रयाण केले आहे.

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने कास्यपदक पटकाविले होते. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना यजमान चीनबरोबर 8 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना जपानबरोबर 9 सप्टेंबरबरोबर खेळविला जाईल. भारताचा तिसरा सामना 11 सप्टेंबरला मलेशियाबरोबर तर 12 सप्टेंबरला कोरियाबरोबर चौथा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना 14 सप्टेंबरला आयोजित केला आहे. या स्पर्धेमध्ये कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान, चीन यांचा समावेश आहे. गटातील आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य सामने 16 सप्टेंबरला तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.

Advertisement

भारतीय पुरूष हॉकी संघ: गोलरक्षक-कृष्णन बहाद्दुर पाटक, सुरज करकेरा, बचावफळी-जर्मनप्रित सिंग, अमित रोहितदास, हरमनप्रित सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित, मध्यफळी-राजकुमार पाल, निलकांत शर्मा, विवेकसागर प्रसाद, मनप्रित सिंग, मोहम्मद राहील मुसेन, आघाडीफळी-अभिषेक, सुखजित सिंग, अरजितसिंग हुंडाल, उत्तम सिंग, गुरूज्योतसिंग.

Advertisement
Tags :

.