For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष हॉकी संघ पराभूत

06:25 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष हॉकी संघ पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात ब्रिटनने भारताचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेत गेल्या शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने विश्वविजेता जर्मनीला 3-0 असा पराभवाचा धक्का दिला होता.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील सामन्यात ब्रिटनतर्फे निकोलासने 2 ऱ्या आणि 11 व्या मिनिटाला असे 2 मैदानी गोल केले. तर 47 व्या मिनिटाला कॅलनेनविलने ब्रिटनचा 3 रा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. ब्रिटनला या सामन्यात 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. भारताला 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना जर्मनी बरोबर 8 जूनला होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.