For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक संकेतामुळे भारतीय बाजार घसरणीत

08:48 PM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागतिक संकेतामुळे भारतीय बाजार घसरणीत
Advertisement

उच्चांकी कामगिरीनंतर सेन्सेक्स  प्रभावीत : सलगची घसरण कायम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील पहिल्या सत्रात सोमवारी व सलग चौथ्या व्यापार सत्रात सेन्सेक्स व निफ्टी घसरीसह बंद झाले. माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि ऊर्जा समभागांच्या विक्रीमुळे बाजार मंदीचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून पुढील संकेत आणि चलनविषयक धोरणाच्या दृष्टिकोनाबाबत गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. त्यामुळे आज जागतिक बाजारात थोडीशी मंदी दिसून आली.

Advertisement

बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स आज 77,863.54 वर उघडला. मात्र दिवसअखेर तो 241.30 अंकांनी घसरून निर्देशांक 77,339.01 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-50 देखील 78.90 अंकांनी घसरून 23,453.80 वर बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी टीसीएस कंपनीचे समभाग हे  3 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. इन्फोसिसचे शेअर्सही 2.82 टक्क्यांनी घसरून बंद झाले, ज्यामुळे सेन्सेक्सवर मोठा दबाव राहिला. याशिवाय एनटीपीसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, इंडसइंड बँक, रिलायन्स, भारती एअरटेल, अल्ट्रा सिमेंट यांचे समभाग लाल चिन्हात राहिले.

दुसरीकडे, टाटा स्टीलचा हिस्सा 2 टक्केपेक्षा जास्त वाढला. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, मारुती, एचडीएफसी बँक यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले.

आज शेअर बाजारातील घसरणीचे कारण?

  1. टीसीएस, इन्फोसिस आणि ऊर्जा समभागांसारख्या आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे आज बाजार घसरला.
  2. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारांची विक्री अजूनही सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून त्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे.
Advertisement
Tags :

.