For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

रेपो रेट वाढीनंतर भारतीय बाजारात पडझड

06:03 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेपो रेट वाढीनंतर भारतीय बाजारात पडझड
Advertisement

सलगच्या तेजीनंतर आरबीआय निर्णयाने घसरण सत्र  : सेन्सेक्स 429 तर निफ्टी 173 अंकांनी प्रभावीत

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत (बुधवारी 7 ऑक्टोबर) रोजी रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स वाढीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात पडझड राहिल्याचे दिसून आले.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : यावेळी प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 429.11 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,638.70 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला एनएसई निफ्टी दिवसअखेर 173.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,603.05 वर बंद झाला आहे. आराबीआयने सादर केलेल्या नवीन रेपो रेटचा परिणाम आगामी काळात गुंतवणूकदार, कर्जासह अन्य घटकांवर होणार आहे. यामुळे त्यावर आधारीतच बाजाराची दिशा निश्चित होत जाणार असल्याचे संकेत शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.

सर्वाधिक हालचाल कुठे?

शेअर्समध्ये, कोटक बँक आणि बीएसई सर्वाधिक वाढलेले होते, तर टायटन आणि अदानी एंटरप्रायझेस सर्वाधिक घसरलेल्यांमध्ये होते. विविध क्षेत्रांमध्येही कमजोरी दिसून आली. निफ्टीमध्ये आयटी, मेटल्स आणि रिअल्टीमध्ये विक्री, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

शेअर्स अपेक्षेपेक्षा जास्त घसरले

अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत संकेत मिळाल्यामुळे दर-संवेदनशील क्षेत्रांवर दबाव आला आणि घोषणेनंतर बाजारात घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयावरही दबाव कायम राहिला. एका डॉलरचा भाव 96.85 रुपयांपर्यंत वाढला.

टेक्निकल चार्ट्सवर सुधारणेची अपेक्षा

एसबीआय सिक्युरिटीजचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज रिसर्चचे प्रमुख सुदीप शाह यांच्या मते, निफ्टी सध्या त्याच्या 20-आणि 50-दिवसांच्या एक्सपोनेंशियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली व्यवहार करत आहे. डेली आरएसआय  ओव्हरसोल्ड पातळीवरून सुधारला आहे, जे अल्प मुदतीत सुधारणेचे संकेत देत आहे. तथापि, जोपर्यंत जोरदार आणि सातत्यपूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत बाजाराची व्यापक दिशा कमजोर राहील.

Advertisement
Tags :

.