अमेरिका इराण तणावामुळे भारतीय बाजार घसरणीसह बंद
अंतिम सत्रात सेन्सेक्स 516 तर निफ्टी 150 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणावाचा परिणाम पुन्हा भारतीय भांडवली बाजारात राहिल्याचे दिसून आले. दरम्यान शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये टायटन, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे समभाग सर्वाधिक वाढल्याची नोंद राहिली होती. जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या वातावरणामुळे भारतीय बाजारातील स्थिती नकारात्मक राहिल्याने शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 77,631 वर उघडला होता, अखेरीस, सेन्सेक्स 516.33 अंकांनी घसरून 77,328.19 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 150.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 24,176.15 वर बंद झाला. सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांपैकी टायटन, रंग उत्पादक कंपनी एशियन पेंट्स, अदानी समूहातील अदानी पोर्ट्स, आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि एचसीएल टेक हे सर्वाधिक वाढले होते.
यामध्ये 1.28टक्के ते 4.76 टक्के पर्यंत वाढ झाली. याशिवाय, टेक महिंद्रा, सन फार्मा, एचयूएल, एनटीपीसी, भारती एअरटेल, कोटक बँक, इंडिगो, रिलायन्स आणि पॉवर ग्रिड हेदेखील समभाग वाढले होते. दुसरीकडे, एसबीआय, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे सर्वाधिक घसरण झालेले पहिले पाच समभाग होते. यामध्ये देखील 1.55 टक्के ते 6.62 टक्के पर्यंत घसरण झाली. याशिवाय, एम अँड एम, एल अँड टी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, ट्रेंट, बजाज फिनसर्व्ह, इटर्नल, टीसीएस, मारुती, आयटीसी आणि बीईएल यांनाही तोटा सहन करावा लागला. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप 0.15 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप 0.22 टक्क्यांनी वाढला. व्यवहारादरम्यान निफ्टी मिडकॅप 100 ने 62,113.85 चा नवीन उच्चांकही गाठला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि निफ्टी बँक यांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. त्याच वेळी, निफ्टी आयटीने सर्वोत्तम कामगिरी केली.
कच्च्या तेलाचा परिणाम
पश्चिम आशियातील तणाव लवकर संपण्याच्या आशा कमी झाल्यामुळे, इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर ब्रेंट क्रूड 0.72 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 100.78 डॉलरवर पोहोचले.
टायटन 4513- एशियन पेन्ट्स 2600
- अदानी पोर्ट 1760
- इन्फोसिस 1179
- एचसीएल टेक 1198
- टेक महिंद्रा 1463
- सनफार्मा 1847
- हिंदुस्थान युनि 2287
- भारती एअरटेल 1834
- एनटीपीसी 402
- कोटक महिंद्रा 380
- इटरग्लोब एव्ही. 4522
- अपोलो हॉस्पिटल 8094
- एयू स्मॉल 1048
- कोलगेट 2196
- बजाज ऑटो 10710
- विप्रो 197
स्टेट बँक 1019- एचडीएफसी बँक 781
- बजाज फायनान्स 955
- अॅक्सिस बँक 1269
- अल्ट्राटेक सिमेंट 11956
- महिंद्रा-महिंद्रा 3321
- लार्सन-टुब्रो 3973
- टाटा स्टील 214
- ट्रेन्ट 4252
- आयसीआयसीआय 1264
- बाजाज फिनसर्व्ह 1816
- इटर्नल 256
- मारुती सुझुकी 13739
- टीसीएस 2394
- आयटीसी 307
- भारत इले. 439
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1435
- पॉवरग्रिड कॉर्प 313
- ब्रिटानिया 5519
- लुपिन 2377
- बँक ऑफ बडोदा 264
- कोल इंडिया 456
- अंबुजा सिमेंट 444
- बीपीसीएल 302