For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय उत्पादन पीएमआय नीचांकी पातळीवर

06:05 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय उत्पादन पीएमआय नीचांकी पातळीवर
Advertisement

जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरणाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे नवीन ऑर्डर्स आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने, मार्चमध्ये भारताच्या खासगी क्षेत्रातील उत्पादन वाढ 45 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली. एचएसबीसीचा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय), फेब्रुवारीतील 56.9 वरून मार्चमध्ये 53.9 पर्यंत घसरला. एस अँड पी ग्लोबलने संकलित केलेला हा डेटा उत्पादन क्षेत्रातील मासिक बदल दर्शवलेला आहे.

Advertisement

जून 2022 नंतरची ही निर्देशांकाची नीचांकी पातळी आहे. एस अँड पी ग्लोबलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘मार्चमध्ये भारतातील उत्पादन उद्योगाची वाढ मंदावली. खर्चाचा दबाव, तीव्र स्पर्धा, बाजारातील वाढती अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील युद्ध यांच्या एकत्रित परिणामांमुळे नवीन ऑर्डर्स कमी झाल्या आणि उत्पादन वाढ मंदावली.

काय म्हणाले अर्थतज्ञ भंडारी

एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थतज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले की, भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय फेब्रुवारीतील 56.9 वरून मार्चमध्ये 53.9 पर्यंत घसरला, जो जून 2022 नंतरचा सर्वात नीचांकी स्तर आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित मर्यादांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. याचा भारतीय उत्पादकांवरही दबाव येत आहे. उत्पादन आणि नवीन ऑर्डर्समध्ये लक्षणीय घट झाली, ज्यामुळे मागणी कमकुवत झाल्याचे आणि अनिश्चितता वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement
Tags :

.