For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर

06:38 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

जपानमधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेतील कबड्डी हा क्रीडा प्रकार 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल.

भारतीय पुरुष कबड्डीr संघामध्ये अयान लोहचब आणि देवांक दलाल यांच्यावर आक्रमणाची जबाबदारी राहिल. प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत भारताच्या या दोन कबड्डीपटूंची कामगिरी दर्जेदार झाली होती. तसेच भारतीय पुरुष कबड्डी संघात अर्जुन देशवाल आणि आशू मलिक यांचाही समावेश करण्यात आला आहे. अनुभवी सुनीलकुमार तसेच सुमीत सांगवान यांच्यावर बचावफळीची जबाबदारी राहिल. पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार या अष्टपैलूंचा समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या हांगझाऊ आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक मिळवले होते. यावेळी पुन्हा या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघ सुवर्णपदक राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील.

Advertisement

भारतीय पुरुष कबड्डी संघ : आशू मलिक, अयान लोहचब, देवांक दलाल, अर्जुन देशवाल, सुनीलकुमार, जयदीप दाहिया, राहुल सेतपाल, गौरव खत्री, सुमीत सांगवान, अंकित जगलन, पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार.

भारतीय महिला कबड्डी संघ : रितू नेगी, पुष्पा राणा, सोनाली शिंगटे, संजू देवी, पूजा काजला, रितू शेरॉन, ज्योती ठाकूर, पिंकी रॉय, मनीषा कुमारी, भावना ठाकूर, राजराणी आणि निकि

Advertisement
Tags :

.