भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ ब्रिटन दौऱ्यावर
06:10 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, बेंगळूर
Advertisement
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने ब्रिटनच्या दौऱ्यावर प्रयाण केले असून या दौऱ्यात सदर संघ 7 सामने खेळणार आहे. सदर दौरा 5 ते 14 जुलै दरम्यान आयोजित केला असून या दौऱ्यात भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या कनिष्ठ महिला संघाबरोबर 7 सामने खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी 24 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे. आगामी होणाऱ्या कनिष्ठांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळविण्याच्या हेतुने हॉकी इंडियाने हा दौरा निश्चित केला आहे.या दौऱ्यामध्ये भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ स्कॉटलंडच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाबरोबर दोन सामने एडीनबर्ग विद्यापीठाच्या मैदानावर खेळणार आहे. त्यानंतर भारतीय कनिष्ठ महिला संघ अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या कनिष्ठ महिला संघासमवेत सामने खेळणार आहे.
Advertisement
Advertisement