महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघ पराभूत

06:32 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / ब्रेडा

Advertisement

युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाला स्थानिक हॉकी क्लबकडून पराभव पत्करावा लागला. ब्रेडसा हॉकी व्हर्जनींग पुश क्लबने भारताचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisement

या दौऱ्यामध्ये भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने पेनल्टी शुट आऊटमध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बेल्जीयमच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने भारताचा 3-2 असा पराभव केला. ब्रेडसा हॉकी व्हर्जनिंग पुश संघ विरूध्दच्या सामन्यात भारततातर्फे कर्णधार रोहितने 18 व्या मिनिटाला, सौरभ कुशवाहने 24 व्या मिनिटाला, अंकित पालने 32 व्या मिनिटाला तर अर्शदिप सिंगने 58 व्या मिनिटाला गोल नेंदविले. ब्रेडसा हॉकसंघातर्फे शेवटच्या मिनिटाला पाचवा आणि निर्णायक गोल नोंदविला. या दौऱ्यात आता भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाचा पुढील सामना जर्मनीबरोबर 28 मे रोजी खेळविला जाणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article