For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय औद्योगिक वाढ मजबूत

06:24 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय औद्योगिक वाढ मजबूत
Advertisement

पश्चिम आशियातील तणावस्थितीत सकारात्मक कामगिरी : अँटिक स्टॉक ब्रोकरेजच्या अहवालात माहिती

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

फेब्रुवारी 2026 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, परंतु काही चिन्हे अशीही आहेत ज्यामुळे चिंता वाढू शकते. अँटिक स्टॉक ब्रोकरेजच्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादन वार्षिक आधारावर 5.2 टक्क्यांनी वाढले. हे बाजाराच्या 4.2 टक्केच्या अंदाजापेक्षा जास्त आणि मागील महिन्याच्या 5.1 टक्केच्या सुधारित आकडेवारीपेक्षाही चांगले आहे.

Advertisement

प्राप्त अहवालानुसार, भांडवली वस्तूंमध्ये 12.5 टक्के आणि पायाभूत सुविधा व बांधकाम क्षेत्रात 11.2 टक्केची मजबूत वाढ दिसून आली. तथापि, ग्राहकोपयोगी टिकाऊ नसलेल्या वस्तूंच्या उत्पादनात 0.6 टक्के घट झाली. प्राथमिक वस्तूंची वाढ 1.8 टक्केच्या मंदगतीने झाली.

उत्पादन क्षेत्रात 6 टक्के दराने वाढ

सुमारे 78 टक्के वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्रात 6 टक्के दराने वाढ झाली, जी मागील महिन्यापेक्षा चांगली आहे. खाणकाम क्षेत्रात 3.1 टक्के, वीज निर्मिती क्षेत्रात 2.3 टक्के वाढ नोंदवली गेली.

या क्षेत्रांमध्ये राहिली चमक

? मोटार वाहने

? यंत्रसामग्री

? मूलभूत धातू

? विद्युत उपकरणे

या घटकांमध्ये नकारात्मकता

? तंबाखू

? वस्त्राsद्योग

? औषधनिर्माण

? पेये या क्षेत्रांमध्ये कमजोरी दिसून आली.

पुढेही विकास मजबूत राहील, पण...

अहवालानुसार, देशाची आर्थिक वाढ मजबूत राहू शकते. याचे कारण म्हणजे लोकांचा खर्च वाढत आहे, सेवा क्षेत्र चांगली कामगिरी करत आहे, जीएसटीमध्ये सुधारणा झाली आहे, व्याजदर कमी आहेत आणि रब्बी पिकांची कापणीही चांगली झाली आहे. महागाईही नियंत्रणात आहे. गुंतवणुकीच्या आघाडीवरही परिस्थिती चांगली दिसत आहे. कंपन्या त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत आहेत, त्यांचे ताळेबंद मजबूत आहेत आणि पतपुरवठा वेगाने वाढत आहे. याव्यतिरिक्त, सरकार भांडवली खर्च सातत्याने वाढवत आहे, ज्यामुळे गुंतवणुकीला आणखी चालना मिळेल.

Advertisement
Tags :

.