महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय हॉकी संघाचा जर्मनीवर विजय

06:37 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी पेडरेशनच्या येथे शनिवारी झालेल्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील सामन्यात हरमनप्रित सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय हॉकी संघाने विश्वविजेत्या जर्मनीचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत प्रो लीग स्पर्धेच्या लंडन टप्प्याला या विजयाने शानदार सुरूवात केली.

Advertisement

या सामन्यात भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने 16 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने जर्मनीवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतातर्फे दोन गोल नोंदविले गेले. 41 व्या मिनिटाला सुखजितसिंगने तर 44 व्या मिनिटाला गुरूजंत सिंगने गोल नोंदविले. हॉकी मानांकनात पाचव्या स्थानावरील भारताने आता प्रो लीग हॉकी स्पर्धेत 13 सामन्यातून 24 गुणासह तिसरे स्थान मिळविले आहे. अर्जेंटिनाचा संघ 14 सामन्यातून 26 गुणांसह दुसऱ्या तर नेदरलँडसने 12 सामन्यातून 26 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना पुन्हा जर्मनीबरोबर 8 जूनला होणार आहे. त्यानंतर भारताचे या स्पर्धेतील सामने ब्रिटन बरोबर 2 आणि 9 जूनला खेळविले जातील.`

Advertisement
Tags :
##tarunbharat#arun#social media#sports
Next Article