भारतीय हॉकी संघ आज अर्जेंटिनाविरुद्ध पुनरागमनास सिद्ध
वृत्तसंस्था/ अॅम्स्टेलवीन (नेदरलँड्स)
सलग दोन पराभवांमुळे सतर्क होऊन भारतीय पुऊष हॉकी संघ आज बुधवारी येथे होणाऱ्या एफआयएच प्रो लीगमध्ये अर्जेंटिनाविऊद्ध पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. भारतासाठी युरोपियन लेगची सुऊवात निराशाजनक राहिली आहे, कारण त्यांना अॅम्स्टेलवीनमध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये नेदरलँड्सविऊद्ध 1-2 आणि 2-3 असा पराभव पत्करावा लागला. दोन्ही वेळा भारताने उशिरा गोल स्वीकारले, ज्यामुळे सामने त्यांच्या हातून निसटले.
पेनल्टी कॉर्नर रूपांतरण ही भारतासाठी चिंतेची आणखी एक बाब आहे. भारताने अनेक संधी वाया घालवल्या असून सोमवारच्या सामन्यात मिळालेल्या नऊ पेनल्टी कॉर्नरपैकी फक्त एकाचे रूपांतर करण्यात त्यांना यश आले. स्पर्धेत अजून सहा सामने खेळायचे बाकी असताना भारत सध्या 15 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय संघ उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्याचा निर्धार करेल.
‘आम्हाला अर्जेंटिनाविऊद्धच्या सामन्यांमध्ये काय करावे लागेल याची जाणीव आहे. संघ दररोज सरावात कठोर परिश्रम करत आहे आणि आम्हाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. अर्जेंटिना हा एक मजबूत संघ आहे आणि या पातळीवर कोणताही सामना सोपा नसतो’, असे कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला. अलीकडच्या काळात दोन्ही संघ वारंवार एकमेकांना भिडले आहेत आणि भारताच्या अर्जेंटिनाविऊद्धच्या सामन्यांचा विचार केल्यास भारताचे पारडे जड आहे. अनुकूल सामना आहे. पॅरिस ऑलिंपिकमधील दोन्ही संघांमधील सामना रंजक ठरून तो शेवटी बरोबरीत संपला होता.
तथापि प्रो लीग 2023-24 मध्ये भारताने अर्जेंटिनाला दोनदा हरवले. त्यापैकी दुसरा विजय शूटआउटद्वारे नोंदवला गेला. ‘आम्ही आमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहोत. आम्ही या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे आणि विविध संयोजन आणि रणनीती वापरून पाहिल्या आहेत. अर्जेंटिनाविऊद्ध दमदार कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे’, असे हरमनप्रीत म्हणाला. प्रो लीगमध्ये भारताने अर्जेंटिनाविऊद्ध कधीही नियमित वेळेत सामना गमावलेला नाही. भारताचा त्यांच्याविरुद्ध एकमेव पराभव 2022 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये झाला.`