For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारतीय हॉकी संघाचा चीनवर 5-2 ने विजय

06:50 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाचा चीनवर 5 2 ने विजय
Advertisement

वृत्तसंस्था, जालंधर : कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि आघाडीपटू सुखजित सिंग यांनी घरच्या प्रेक्षकांसमोर प्रत्येकी दोन गोल करत भारताला युवा चीन संघाचा 5-2 असा पराभव करण्यास मदत केली. या विजयामुळे भारताने येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

Advertisement

सुखजितने (12 व्या, 34 व्या मिनिटाला) दोन उत्कृष्ट मैदानी गोल केले, तर हरमनप्रीतने (27 व्या, 31 व्या मिनिटाला) भारतासाठी दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर यजमान संघासाठी जुगराज सिंगने (47 व्या मिनिटाला) देखील गोल केला. चीनने आपले दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून केले, जे पेंग यांग (26 व्या मिनिटाला) आणि चोंगकॉन्ग चेन (36 व्या मिनिटाला) यांनी गोलमध्ये रूपांतरित केले.

भारताने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशला 13-0 ने पराभूत केले होते, तर चीन मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाकडून 4-5 ने पराभूत झाला होता. भारताचा पुढील सामना जपानशी होईल, तर चीनचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. भारतीयांनी सुऊवातीपासूनच खेळावर नियंत्रण ठेवले आणि अनेकदा प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात घुसखोरी केली, परंतु 13 व्या मिनिटापर्यंत त्यांना कोणतीही खरी संधी निर्माण करता आली नाही.

Advertisement

13 व्या मिनिटाला जुगराजने हाणलेला अचूक स्कूप फटका चिनी गोलक्षेत्रात एकटा असलेल्या सुखजितपर्यंत पोहोचला आणि या आघाडीपटूने चेंडूवर सुंदर पद्धतीने नियंत्रण मिळवून तो चिनी गोलरक्षक हुआन्यू वूच्या डोक्यावरून मारून भारतासाठी गोल केला आणि सामन्यातील कोंडी फोडली. तऊण आणि अननुभवी चिनी संघाने भारतीयांच्या अनेक आक्रमणांना हाणून पाडले आणि 26 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. पण एका मिनिटानंतर यजमानांच्या तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने जोरदार लो-फ्लिक मारून गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर भारतीयांनी चांगली सुऊवात केली आणि संघाच्या चौथ्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने पुन्हा एकदा फ्लिक मारून गोल करत यजमान संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतर भारताने आपली आघाडी वाढवली. यावेळी मध्य रेषेवरून हरमनप्रीतने दिलेल्या चेंडूवर आदित्य अर्जुन लालगेने नियंत्रण मिळवून दिलेल्या पासवर सुखजितने गोल केला.

Advertisement
Tags :

.