For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत 10 दिवसांपासून भारतीय युवती बेपत्ता

06:24 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत 10 दिवसांपासून भारतीय युवती बेपत्ता
Advertisement

शोधण्याकरता पोलिसांनी मागितली लोकांची मदत

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय युवती बेपत्ता झाली आहे. या युवतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता लोकांची मदत मागितली आहे. 25 वर्षीय फेरिना खोजा 10 दिवसांपासून गायब आहे. 1 मार्च रोजी रात्री 11 वाजता ती घरातून बाहेर पडली होती. यानंतर ती घरी परतली नाही. अखेरच्या वेळी तिला ऑलिव ग्रीन कलरचे जॅकेट, ग्रीन स्वेटर आणि ब्ल्यू जीन्समध्ये पाहिले गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

न्यूयॉर्क पोलिसांनुसार फेरिन खोजला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार असून यात मूडमध्ये तीव्र बदलत होत असल्याने रुग्णाची एनर्जी अॅक्टिव्हिटी लेव्हल प्रभावित होते. या असाधारण मूड शिफ्ट्समुळे रुग्णासाठी दैनंदिन काम करणे देखील अवघड ठरते. हा डिसऑर्डर मेनिक-डिप्रेसिव्ह इलनेस म्हणूनही ओळखला जातो. मूडमध्ये उतार-चढाव होत असल्याने रुग्ण नैराश्यात असतो. स्क्रिझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर अत्यंत गंभीर मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांमुळे सर्वाधिक आत्महत्या होत असतात.

बेपत्ता युवतीच्या शोधाकरता लोकांकडून मदत मागितली जात आहे. तसेच तिचे छायाचित्र असलेली पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. याचबरोबर भारताच्या दूतावासाला यासंबंधी कळविण्या आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.