For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय फुटबॉल संघाची घोषणा

06:05 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
Advertisement

एएफसी आशिया चषक पात्र फेरी स्पर्धा 31 ऑगस्टपासून

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ताश्कंदरमध्ये 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटातील आशिया चषक पात्रफेरी स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने बुधवारी 23 सदस्यांचा संघ जाहीर केला.

Advertisement

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय फुटबॉल संघामध्ये राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या 8 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. तांत्रिक समस्या तसेच दुखापतीमुळे या खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. भारतीय फुटबॉल संघ गुरुवारी ताश्कंदरमध्ये दाखल होईल. त्यांचा सलामीचा सामना 31 ऑगस्ट रोजी सिरीयाबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताला यजमान उझ्बेकबरोबर 3 सप्टेंबरच्या सामन्यात लढत द्यावी लागेल. या स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारताचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या गटातील भारताचा शेवटचा सामना 6 सप्टेंबर रोजी बांगलादेश बरोबर होईल. सदर पात्र फेरीच्या स्पर्धेतील गट विजेते 2027 मध्ये चीन येथे होणाऱ्या आशिया चषक 20 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी फुटबॉल स्पर्धेसाठी भाग घेतील.

भारतीय संघ: गोलरक्षक-जसकरण डुब, प्रणव सुंदरमन, ए. सुरज सिंग, बचावफळी-अॅशेर रिबेलो, बंगसन सिंग टी., करीश सोरम, एम. थोकचोम, सुमीत शर्मा, वाय. चिंगखाम, मध्यफळी-अंकित यादव, डॅनी लईशरम, मोहम्मद अरबास, ऋषी सिंग, रिशीकांता मेताई, सॅमसन ए., शमी सिंगमेयुम. आघाडी फळी- एम. डॅनियल, गुनेलिबा, हतीम अली, ओमांग दोडुम, प्रशान जेजो, रोहेन सिंग आणि विशाल यादव.

Advertisement
Tags :

.