इंडियन फुटबॉल लीग ऑक्टोबरमध्ये
06:26 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
2026-27 च्या फुटबॉल हंगामातील इंडियन फुटबॉल लीग स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी विविध क्लबना कमाल तीन विदेशी फुटबॉलपटूंना संधी देण्याचा नियम करण्यात आला आहे.
सोमवारी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रमुख कार्यालयामध्ये नियंत्रिण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध 11 क्लबपैकी 10 क्लबचे सदस्य उपस्थित होते. मोहमेडन स्पोर्टिंग क्लबचा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकला नाही.
Advertisement
Advertisement