महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंका नौदलाचे जहाज धडकल्यामुळे भारतीय मच्छिमाराचा मृत्यू

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /रामेश्वरम

Advertisement

श्रीलंकेच्या नौदलाचे जहाज धडकल्याने भारतीय मच्छिमारांची एक नौका उलटली आहे. या दुर्घटनेत एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. संबंधित नौकेवर 4 मच्छिमार होते. ज्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक बेपत्ता आहे. उर्वरित दोन मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहे. दुर्घटनेनंतर दिल्लीत श्रीलंकेच्या अंतरिम उच्चायुक्तांना विदेश मंत्रालयाने पाचारण करत या घटनेप्रकरणी विरोध नोंदविला आहे. कोलंबोतील भारतीय दूतावासाने देखील हे प्रकरण श्रीलंका सरकारसमोर उपस्थित केले असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता कच्चातिवु बेटानजीक ही दुर्घटना घडली आहे. दोन मच्छिमारांना वाचवून कांकेसंतुरई किनाऱ्यावर आणले गेले. तर बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेतला जातोय. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कांकेसंतुरई येथे पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article