अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीचा दुर्घटनेत मृत्यू
06:05 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शिकागो:
Advertisement
अमेरिकेच्या शिकागोनजीक इंटरस्टेट 65 वरील रस्ते दुर्घटनेत 25 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. मृत विद्यार्थिनीचे नाव नव्या गडूसू असल्याचे समोर आले आहे. नव्या ही मूळची तेलंगणाची रहिवासी होती. लेक काउंटी कोरोनरच्या कार्यालयाने तिच्या मृत्यूची घोषणा केली आहे. एक कारचालक कारला डाव्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत होता, यादरम्यान संबंधित कारने मिनिव्हॅनला ठोकरले होते. यामुळे मिनिव्हॅन रस्त्यावरून खाली उतरत खोल दरीत कोसळली होती. मिनिव्हॅनमध्ये समोर दोन सीट्स होत्या, उर्वरित लोक सीटबेल्टशिवाय आंब्यांच्या पेटीवर बसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Advertisement
Advertisement