For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारतीय इलेक्ट्रीक बाइकची विदेशात होणार निर्यात

06:12 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय इलेक्ट्रीक बाइकची विदेशात होणार निर्यात
Advertisement

अल्ट्राव्हायोलेट कंपनी युरोप, अमेरिकेतल्या देशांवर लक्ष: किमत 3 लाखापर्यंत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीव्ह ही मुळची बेंगळूरची कंपनी येत्या 2 ते 3 वर्षात एकूण बाइक विक्रीत 20 ते 25 टक्के इतकी निर्यात करण्यावर भर देणार असल्याची माहिती मिळते आहे. कंपनी आपल्या बाइकची निर्यात युरोप, उत्तर अमेरिका व लॅटिन अमेरिका या देशांमध्ये निर्यात करुन तेथे नव्या बाइक्स सादर करणार आहे.

Advertisement

नवीन मॉडेल लाँच करणार

कंपनीला आपला निर्यातीतला वाटा 20 ते 25 टक्के इतका करायचा आहे. अल्ट्राव्हायोलेट सध्याला तामिळनाडूतील होसूर येथे 2 लाख 50 हजार बाइक्स निर्मिती करण्याचे नियोजन करत आहे. कंपनी व्हीएक्स 100 हे मॉडेल सादर करते आहे. यासोबत कंपनीने एक्स-47 वेनम ही बाइक लाँच केली आहे. पुढील वर्षी व्हीएक्स-100 अंतर्गत चार बाइक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात शॉकव्हेव व टॅसरॅक्ट या गाड्यांचा समावेश आहे.

किती असणार किंमत

एक्स-47 बाइकच्या बुकिंगला सुरुवात झाली असून सुरुवातीला बुक झालेल्या 5000 बाइक्सची किमत 2 लाख 65 हजार रुपये प्रत्येकी इतकी असणार आहे. यानंतर नियमीत स्वरुपात या गाडीची किंमत 3 लाख रुपये इतकी असणार आहे.  यात 12 किलोवॅटची डीसी फास्ट चार्जिंगची व्यवस्था आहे.

20 देशांना पाठवणार

कंपनी आपल्या बाइक्सना जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलँड व युकेसमवेत 20 युरोपिय देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात करण्यावर अधिकचा भर देणार आहे. त्यासाठी आवश्यक रणनिती आखली जात आहे.

Advertisement
Tags :

.