भारतीय अर्थव्यवस्था 6.5 ते 7 टक्क्यांनी वाढणार : एस अॅण्ड पी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने गुरुवारी भारतीय अर्थव्यवस्था मार्च 2025 ते मार्च 2027 या तीन आर्थिक वर्षांत वार्षिक 6.5-7 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च आणि खासगी वापरामुळे वाढीचा वेग हे याचे प्रमुख कारण असेल. आपल्या अहवालात, एस अॅण्ड पी ने म्हटले आहे की चांगल्या आर्थिक विकासाच्या शक्यता लक्षात घेता विकास दर वाढीव राहिल. देशाची आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता अधिक आहे.
भारताचा पायाभूत सुविधा खर्च आणि खासगी उपभोग मजबूत आर्थिक वाढीस समर्थन देईल, एस अॅण्ड पीने म्हटले आहे. आमचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2025-2027 मध्ये (31 मार्च रोजी संपणारे वर्ष) एकूण देशांतर्गत उत्पादन वार्षिक 6.5-7.0 टक्क्यांनी वाढेल. भारताच्या चांगल्या आर्थिक विकासाच्या शक्यता बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेला समर्थन देत राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी 7.2 टक्के आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवला आहे, जो 2023-24 मध्ये 8.2 टक्के राहिला होता.