For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुवेतमधील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुवेतमधील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
Advertisement

विमानतळावर ड्रोन हल्ला : दूतावासाकडून पुष्टी

Advertisement

धोकादायक....

  • इराणचा कुवेत, बहरीनमध्ये अमेरिकी तळांवर हल्ला
  • सर्व हल्ले अयशस्वी झाल्याचे अमेरिकेचे स्पष्टीकरण
  • होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणी बेट अमेरिकेकडून लक्ष्य

वृत्तसंस्था/तेहरान, नवी दिल्ली

Advertisement

कुवेत विमानतळावर बुधवारी झालेल्या भीषण हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने या दु:खद घटनेची पुष्टी केली आहे. दूतावास भारतीय नागरिकाच्या मृत्यूवर तीव्र दु:ख व्यक्त करत आहे. दूतावासाचे अधिकारी शोकाकुल कुटुंबाच्या सतत संपर्कात असून, कुटुंबाला सर्वतोपरी मदत आणि आधार देण्यासाठी कुवेती अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांनाही दूतावास पूर्ण मदत करत असल्याचे सांगण्यात आले. इराणने मंगळवारी रात्री अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रs आणि ड्रोनचा नवा मारा केल्याने आखाती प्रदेशातील तणाव पुन्हा वाढला आहे.

पर्शियन आखात, होर्मुझच्या आसपास आणि केशम बेटांवर अमेरिकेने केलेल्या शत्रुत्वपूर्ण कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये कुवेतमधील अल सालेम हवाई तळ आणि बहरीनमधील ईसा हवाई तळाला लक्ष्य करण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रदेशात सुरक्षा सतर्कता जारी करण्यात आली. अमेरिकन हवाई संरक्षण प्रणालीने अनेक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन हवेतच पाडले, असे कुवेती लष्कराने सांगितले. संभाव्य धोक्याला प्रतिसाद म्हणून धोक्याचे सायरन वाजवण्यात आले आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्याचे  बहरीनच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) याबाबत भाष्य करताना त्यांनी इराणच्या केशम बेटावर आत्मसंरक्षणासाठी कारवाई केल्याचे सांगितले. अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सैन्याने इराणचे अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडले. यापूर्वी, इराणी माध्यमांनी केशम बेटाजवळ स्फोट झाल्याचे वृत्त दिले होते. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम असतानाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे थांबलेला नाही, असे  सांगितले. युद्ध संपवण्यासाठीची चर्चा थांबली असल्याच्या वृत्तांना त्यांनी फेटाळून लावले. अमेरिका आणि इराण यांच्यात सतत संवाद सुरू आहे, असे ट्रम्प म्हणाले.

इराणचा कुवेतमध्ये धुमाकूळ

इराणने कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राजनैतिक दूतावासासह अत्यंत संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करून कुवेतच्या सार्वभौमत्वाचे पूर्णपणे उल्लंघन केले. या हल्ल्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीने या रक्तरंजित आणि भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अत्यंत आक्रमक निवेदन जारी केले आहे. राजनैतिक दूतावासांना लक्ष्य करणे हे व्हिएन्ना कराराचे उघड उल्लंघन आहे आणि इराणची ही कृती संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा एक ‘धोकादायक आणि खळबळजनक कट’ आहे, असे त्यात म्हटले आहे.

कुवेत विमानतळ टार्गेट

कुवेत विमानतळावरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 वर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तील प्राण गमवावे लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करताना स्पष्ट केले आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोनचा वापर करून सतत आणि क्रूर हल्ले केल्याचा आरोप इराणवर आहे. मंत्रालयाने या हल्ल्यांना प्रादेशिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. निवेदनानुसार, पहाटे झालेल्या हल्ल्यात कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक नागरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.

Advertisement
Tags :

.