For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एससीओ बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळ पाकिस्तानात

06:36 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
एससीओ बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळ पाकिस्तानात
Advertisement

ऑपरेशन सिंदूरच्या दीड वर्षांनी दौरा : पुढील वर्षाच्या शिखर परिषदेसाठी मोदींना निमंत्रण शक्य

Advertisement

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुमारे दीड वर्षांनी भारताचा वरिष्ठ अधिकारी एससीओ अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि भारताचे एससीओ राष्ट्रीय समन्वयक आलोक डिमरी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ 28-30 सप्टेंबरदरम्यान इस्लामाबादमध्ये आयोजित होणाऱ्या बैठकांमध्ये सहभागी होत आहे.

Advertisement

पाकिस्तान 2026-27 या कालावधीसाठी एससीओच्या अध्यक्षस्थानी आहे. बैठकीत पाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक, आगामी बैठकांची तयारी आणि संघटनेतील सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे.

पाकिस्तान ऑगस्ट 2027 मध्ये इस्लामाबाद येथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेसाठी सर्व सदस्य देशांच्या नेत्यांना निमंत्रण देण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र मोदी हे पाकिस्तानचा दौरा करतील की नाही याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती नाही.

एससीओच्या व्यासपीठावर सहभाग

भारताची पाकिस्तान सोबतची द्विपक्षीय संबंधांची भूमिका आणि एससीओमधील बहुपक्षीय सहभाग हे स्वतंत्र मुद्दे आहेत. भारतीय अधिकारी एससीओच्या नियमित प्रक्रियेत सहभागी होत असले तरीही या बैठकीचा मुख्य अजेंडा एससीओचे कामकाज आणि आगामी कार्यक्रमांची तयारी हा आहे.

2024 मध्ये जयशंकर यांचा दौला

ऑक्टोबर 2024 मध्ये विदेशमंत्री एस. जयशंकर हे एससीओच्या बैठकीसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. जवळपास 9 वर्षांनी पाकिस्तानला भेट देणारे ते पहिले भारतीय विदेशमंत्री ठरले होते.

2001 साली एससीओची स्थापना

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनची स्थापना 2001 साली चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तान यांनी केली होती. भारत आणि पाकिस्तान हे देश 2017 साली या समुहाचे पूर्णवेळ सदस्य झाले. संघटनेचा भर प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य, आर्थिक सहकार्य आणि संपर्कव्यवस्थेवर आहे.

Advertisement
Tags :

.