भारतीय ग्राहकांची स्कोडाला पसंती
जून 2025 पर्यंत 36,194 युनिट्सची विक्री
नवी दिल्ली :
स्कोडा ऑटो इंडियाने विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम प्र्राप्त केला आहे. 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत, स्कोडा ऑटो इंडियाने सर्वाधिक कार विकल्या आहेत. म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत स्कोडाच्या एकूण 36,194 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री 134 टक्के जास्त आहे. याच वेळी, कंपनी आता भारतातील टॉप 7 ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.
लोकांना स्कोडाची ही कार सर्वाधिक आवडते?
स्कोडाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारबद्दल बोलायचे झाले तर ती स्कोडा कायलॅक आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, सर्वाधिक लोकांनी अलीकडेच लाँच केलेली स्कोडा कायलॅक खरेदी केली. स्कोडा कायलॅक या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली होती. ही सब-4 मीटर एसयूव्ही त्यांच्यासाठी आहे जे पहिल्यांदाच स्कोडा खरेदी करत आहेत. स्कोडाने अलीकडेच दुसऱ्या पिढीची कोडियाक लक्झरी 4 बाय 4 एसयूव्ही देखील लाँच केली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, आमच्या विक्रमी विक्रीवरून असे दिसून येते की लोक भारतात स्कोडा उत्पादने आणि सेवांना पसंती देत आहेत. आता आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये कायलॅकचाही समावेश केला आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना सेडानसह आणखी चांगले पर्याय मिळत आहेत.