For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कॉमेडियनला दुबईत अटकाव

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय कॉमेडियनला दुबईत अटकाव
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारताचा स्टँडअप कॉमेडियन यश भारद्वाज याला दुबईमध्ये काही काळ स्थानबद्धतेत ठेवण्यात आले असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेल्या एका व्हिडीओला दुबई प्रशासनाने आक्षेप घेत त्याला पावणेतीन महिन्यांपूर्वी  ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. स्थानबद्धतेचे नेमके कारणही त्याच्याकडे स्पष्ट करण्यात आले नाही. तब्बल 47 दिवसांनंतर त्याची सुटका करण्यात आली. आता तो भारतात परतला असून त्याने आपला अनुभव मांडला आहे. अन्यायपूर्ण पद्धतीने अटकाव केल्याचा आरोप त्याने केला आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध होत आहे. या युद्धात दुबईवरही काही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

या हल्ल्यामुळे दुबईतील इंटरनेट सेवा बंद होती. त्या काळात दुबईत गुगल मॅप सेवाही बंद होती. या संदर्भात त्याने एक विडंबनात्मक व्हिडीओ रील करुन प्रसिद्ध केले. त्यानंतर त्याला दुबई पोलिसांकडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. चौकशीला आपण सहकार्य करीत असतानाही आपल्याला स्थानबद्ध ठेवण्यात आले. 47 दिवसांच्या नंतर आपली सुटका करण्यात आली, अशी माहिती त्याने भारतात आल्यानंतर दिली. 5 मे या दिवशी तो भारतात परतला. या घटनेमुळे आपल्याला मोठा मानसिक धक्का बसल्याचे त्याने पत्रकारांसमोर स्पष्ट केले. कोणतीही चूक नसताना आपल्याला त्रास देण्यात आला. स्थानबद्धतेत असतानाही आपल्याला नियमांच्या अनुसार वागणूक दिली गेली नाही, असाही आरोप त्याने केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.