महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंडियन बॉईज हिंडलगा, के आर शेट्टी किंग्स विजयी

10:01 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 क्रिकेट स्पर्धा : दोन्ही संघांचे पहिलेच विजय

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी ख्sळविण्यात आलेल्या सामन्यातुन इंडियन बॉइज हिंडलगा सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचा व के आर शेट्टी किंग्स संघाने  साई फार्म स्पोर्ट्स क्लबचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. तनिष्क नाईक(हिंडलगा) राजेंद्र दंगणावर (के.आर. शेट्टी) यांनी सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार तनिष्क नाईकच्या शानदार शतकाच्या जोरावर इंडियन बॉईज हिंडलगा संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. सुपर एक्सप्रेस संघाने  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडीबाद 159 धावा केल्या. त्यात दर्शन पाटीलने 6 चौकार व 2 षटकारांसह 47, पार्थ पाटीलने 3 षटकार एक चौकारांसह 32, केतज कोल्हापुरेने 21, शिवप्रकाश हिरेमठने 20 धावा केल्या. इंडियन बॉइज तर्फे सुशांत कोवाडकरने 3 तर सुमित करगावकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार तनिष नाईकच्या धडाकेबाज 55 चेंडूत 8 चौकार व 7 षटकारांसह जलद 101 धावांच्या जोरावर इंडियन इंडियन बॉईज संघाने 16.1 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा जमवत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विजय पाटीलने 38 तर परीक्षेत उकुंदने 18 धावांचे योगदान दिले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात के.आर. शेट्टी संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लबचा 31 धावांनी पराभव केला. केअर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 174 धावा केल्या. त्यात स्वप्नील ऐळवेने 3 षटकार व 3 चौकारांसह 49, राजेंद्र दंगणावरके 2 षटकार व 3 चौकारांसह 31, नरेंद्र मांगोरेने 2 षटकार व 2 चौकारांसह 32,  प्रणय शेट्टीने 1 षटकार 2 चौकारांसह 24 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे अमर घाळेने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना  साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 9 गडीबाद 143 धावा केल्या. त्यात कर्णधार रोहित पोरवालने 6 चौकार एक षटकारांसह 57, वैभव कुरीबागीने 27, मिलिंद चव्हाणने 22 धावा केल्या. के आर शेट्टी तर्फे राजेंद्र दंगनावर व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे एस एम जाधव एन वाय कंग्राळकर व विठ्ठल गवस यांच्या हस्ते सामनावीर तनिष्क नाईक व इम्पॅक्ट खेळाडू सुशांत यांना चषक प्रदान करण्यात आले तर दुसऱ्या सामनयत सामनावीर राजेंद्र दंगणावर व इम्पॅक्ट खेळाडू  रोहित पोरवाल यांना प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पाटील व जयसिंग रजपूत यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article