For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय मुष्टीयुद्ध संघाची घोषणा

06:22 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय मुष्टीयुद्ध संघाची घोषणा
Advertisement

लवलिना, निखत, सचिन यांच्याकडे संघाचे नेतृत्व

Advertisement

वृत्तसंस्था, / नवी दिल्ली

मंगोलीयात होणाऱ्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी शनिवारी घोषित करण्यात आलेल्या 20 सदस्यांच्या भारतीय मुष्टीयुद्ध संघाचे नेतृत्व प्रामुख्याने ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोर्गोहेन आणि विश्वचॅम्पियन निखत झरीन यांच्याकडे राहील. आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी मंगोलीयातील ही स्पर्धा पात्र फेरीसाठी महत्त्वाची आहे. मंगोलीयातील ही स्पर्धा 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान होणार आहे.

Advertisement

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय पुरूष आणि महिलांच्या संघांमध्ये स्पेनमध्ये अलिकडेच झालेल्या बॉक्सम इलाईट चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या लवलिना बोर्गोहेन, प्रिती, अरुंधती चौधरी आणि प्रिया तसेच पुरूषांच्या विभागात सचिन सिवाच यांचा समावेश आहे. विश्व मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत सचिनने सुवर्णपदक पटकाविले होते. स्पेनमध्ये झालेल्या बॉक्सम इलाईट मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने 9 सुवर्णपदकाची कमाई केली होती. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा आणि सध्या पतियाळा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत 20 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे.

मंगोलीयातील स्पर्धेत भारतीय संघ दर्जेदार कामगिरी करुन अधिक पदकांची कमाई करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. स्पेनमधील स्पर्धेत लवलिनाने 75 किलो गटात, प्रितीने 54 किलो गटात, अरुंधती चौधरीने 70 किलो गटात, प्रियाने 60 किलो गटात सुवर्णपदके मिळविली होती. आता या संघामध्ये 48 किलो गटात मिनाक्षी आणि 57 किलो गटात जस्मीन यांनाही स्थान देण्यात आले आहे. 51 किलो गटात निखत झरीन, 65 किलो गटात अंकुशिता बोरो, 80 किलो गटात पूजाराणी आणि 80 किलो वरील गटात अल्फीया पठाण यांचाही संघात समावेश आहे.

भारतीय मुष्टीयुद्ध संघ- पुरूष- विश्वनाथ सुरेश (50 किलो गट), जादुमनी सिंग एम. (55 किलो गट), सचिन सिवाच (60 किलो गट), आदित्य यादव (65 किलो गट), दीपक (70 किलो गट), आकाश (75 किलो गट), अंकुश (80 किलो गट), लोकेश (85 किलो गट), हर्ष चौधरी (90 किलो गट), नरेंद्र (90 किलो वरील).

महिला- मिनाक्षी (48 किलो गट), निखत झरीन (51 किलो गट), प्रिती (54 किलो गट), जस्मिन (57 किलो गट), प्रिया (60 किलो गट), अंकुशिता बोरो (65 किलो गट), अरुंधती चौधरी (70 किलो गट), लवलिना बोर्गोहेन (75 किलो गट), पूजाराणी (80 किलो गट), अल्फीया पठण (80 किलो वरील).

Advertisement
Tags :

.