राष्ट्रकूल स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघ जाहीर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने 37 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला असून या संघाचे नेतृत्व भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकधारक नीरज चोप्राकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी फेडरेशनच्या निवड समितीने 37 सदस्यांच्या संघामध्ये 18 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या प्रमुख महिला धावपटू हिमा दास आणि दुतीचंद यांनी महिलांच्या 4×100 रिले संघात स्थान मिळविले आहे. भारताच्या 4×400 मी. रिले संघातील धावपटुंची निवड केली आहे. सदर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय संघामध्ये अविनाश साबळे तसेच ज्योती येराजी यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे अलिकडेच चेन्नईत झालेल्या आंतरराज्य राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिहेरी उडीत नवा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या ऐश्वर्या बाबूलाही संधी मिळाली आहे. अमलान बोर्गोहेन तसेच सीमा पुनिया, गोळाफेकधारक तजिंदरपाल सिंग तूर, केरळची एम. व्ही. जिलना यांनाही संधी मिळाली आहे. कर्नाटकाच्या सिमीला या संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघ पुरुष - अविनाश साबळे, नितेंद्र रावत, एम. श्रीशंकर, मोहम्मद अनीस याहिया, अब्दुल्ला अबुबाकर, प्रवीण चित्रवेल, एल्डहॉस पॉल, तजिंदरपाल सिंग तूर, नीरज चोप्रा, डी.पी. मनु, रोहित यादव, संदीप कुमार, अमीत खत्री, अमोल जेकॉब, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथन पंडी आणि राजेश रमेश.
भारतीय संघ महिला - एस. धनलक्ष्मी, ज्योती याराजी, बी. ऐश्वर्या, अँसी सोजन, मनप्रीत कौर, नवजीत कौर धिल्लॉ, सीमा पुनिया, अनुराणी, शिल्पा राणी, मंजू बालासिंग, सरिता रोमितसिंग, भावना जाट, प्रियांका गोस्वामी, हिमा दास, दुतीचंद, श्राबनी नंदा, एम.व्ही. जिलना आणि एन.एस. सिमी.