महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय अॅथेलेटिक पथक पूर्ण तंदुरुस्त

06:22 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय अॅथेलेटिक पथकातील सर्व अॅथलिटस् पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सीएमओ डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी सांगितले. संपूर्ण फिट असलेल्या भारतीय अॅथलेटिक पथकामध्ये भालाफेकधारक निरज चोप्राचा समावेश आहे.

Advertisement

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचे जवळपास 120 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे. या पथकाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. पारडीवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पथकाबरोबर 13 सदस्यांचे वैद्यकीय पथकही पॅरिसला जाणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकसाठी निवडण्यात आलेल्या अॅथलिटस् पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे पारडीवाला यांनी सांगितले. दरम्यान या पथकातील काही अॅथलिटसना किरकोळ प्राकृतिक समस्या जाणवत असल्या तरी त्यांची काळजी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतवर पारडीवाला यांनी वैद्यकीय इलाज करुन त्याला पूर्णपणे बरे केले. मोटार दुर्घटनेमध्ये पंतला गंभीर दुखापती झाल्या होत्या. पण पारडीवालाच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने त्याला पूर्णपणे तंदुरुस्त केले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताने 7 पदकांची कमाई केली होती. पण 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताकडून अधिक पदकांची कमाई होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article