For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोईंग, स्क्वॅश, महिला वुशू, बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच

06:23 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोईंग  स्क्वॅश  महिला वुशू  बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच
Advertisement

आयची-नागोया :

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंगमध्ये सतनाम-सलमान, बलराज पनवार यांनी अंतिम फेरी गाठली आहे तर महिलांच्या वुशूमध्ये रोशिबिना देवीने अंतिम फेरी गाठत सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे. बॉक्सिंगमध्ये अंकुश पांघलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर स्क्वॅश या क्रीडा प्रकारात अभय सिंह, वीर छोत्रानी व तन्वी खन्ना यांनी शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविले आहे.

भारतीय रोअर्स सतनाम सिंह, सलमान खान आणि बलराज पनवार यांनी बुधवारी एशियन गेम्स 2026 मध्ये आपापल्या रोइंग प्रकारांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Advertisement

सतनाम सिंह आणि सलमान खान यांनी पुऊषांच्या डबल स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यांनी आपल्या हीटमध्ये 6:15.63 वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. दोनही हीट्समधील एकूण क्रमवारीत भारतीय जोडी चौथ्या स्थानावर राहिली आणि त्यामुळे त्यांनी गुऊवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.

दरम्यान, बलराज पनवार याने पुऊषांच्या सिंगल स्कल्स प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने आपल्या हीटमध्ये 6:52.84 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. दोन्ही हीट्समधील एकूण क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर राहिला आणि त्यामुळे पदकाच्या शर्यतीत स्थान निश्चित केले. आता भारतीय रोइंग संघाचे लक्ष्य या दमदार पात्रता कामगिरीचे पदकांमध्ये रूपांतर करण्यावर असेल.

याशिवाय भारताच्या हर्षवर्धन शक्तावत, वरिंदर सिंह, एल. नाओचा सिंह ओइनाम आणि अऊण सिंह यांनी पुऊषांच्या कयाक फोर 500 मीटर प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय चौकडीने हीट 1 मध्ये 1:29.447 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. ते आघाडीवर असलेल्या चीनच्या संघापेक्षा 5.594 सेकंदांनी मागे होते. हीटमध्ये तिसरे स्थान मिळाल्याने भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंत एकूण सात पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.

रोशिबिना देवी वुशूच्या सुवर्णपदकानजीक

भारतीय वुशूपटू रोशिबिना देवी नाओरेम हिने महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या थानिया कुसुमानिंगत्यास हिचा पराभव करून वुशूच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रोशिबिनाने 2-0 असा विजय मिळवला. आता सुवर्णपदकासाठीच्या अंतिम सामन्यात तिची गाठ चीनच्या झियाओयू झांग हिच्याशी पडणार आहे. रोशिबिनाने यापूर्वी एशियन गेम्सच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. यावेळी सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने ती अंतिम सामन्यात उतरणार आहे. मूळ भारतीय संघात दिव्यांशी चौधरी हिची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे तिला संघातून माघार घ्यावी लागल्यानंतर रोशिबिनाचा उशिराने भारतीय पथकात समावेश करण्यात आला.

बॉक्सर अंकुश पांघल उपांत्यपूर्व फेरीत

एशियन गेम्समध्ये भारतीय बॉक्स्ंिागची दमदार सुऊवात कायम ठेवत अंकुश पांघलने पुऊषांच्या 80 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एशियन गेम्समध्ये पदार्पण करणाऱ्या 21 वषीय अंकुशने राउंड ऑफ 16 मध्ये बहरीनच्या हम्सा व्हगेल याचा 5-0 असा एकमताने पराभव केला. कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता अंकुशने गेल्या वषी वर्ल्ड बॉक्स्ंिाग कप फायनलमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आता एशियन गेम्समध्ये पदक निश्चित करण्यासाठी त्याला केवळ आणखी एका विजयाची गरज आहे. उपांत्यपूर्व फेरीत अंकुशचा सामना ताजिकिस्तानच्या नेव्रुझ सलीमोव्ह याच्याशी होणार आहे. भारतीय बॉक्सरांनी स्पर्धेत दमदार सुऊवात केली असून आतापर्यंत रिंगमध्ये उतरलेल्या चारही भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आपापल्या पहिल्या लढतीत प्रभावी विजय मिळवला आहे.

अभय, वीर, तन्वी स्क्वॅशमध्ये आगेकूच

भारतीय स्क्वॅशपटू अभय सिंह, वीर छोत्रानी आणि तन्वी खन्ना यांनी स्क्वॅश स्पर्धेत आपापल्या एकेरी सामन्यांत सहज विजय मिळवत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. दुसरे मानांकन असलेल्या अभय सिंहने पुऊषांच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या अरकराडेट अरकराहिऊन्या याचा एकतर्फी पराभव केला. अभयने हा सामना 11-1, 11-0, 11-2 असा जिंकला. त्याने संपूर्ण सामन्यात केवळ तीन गुण गमावले.

वीर छोत्रानीने राउंड ऑफ 32 मध्ये श्रीलंकेच्या शमिल वकील याचा 11-8, 11-3, 11-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. महिलांच्या एकेरीत तन्वी खन्नाने दक्षिण कोरियाच्या दामी किम हिच्यावर 11-5, 11-7, 11-5 असा विजय मिळवत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. भारताची सध्या 17 व्या क्रमांकाची सर्वोच्च मानांकित खेळाडू अनाहत सिंह गुऊवारी आपल्या एशियन गेम्स मोहिमेला सुऊवात करणार आहे. राउंड ऑफ 16 मध्ये तिचा सामना सिंगापूरच्या ऑ येओंग वाई लिन हिच्याशी होणार आहे.

स्क्वॅशचा 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश होणार आहे. एशियन गेम्समधील पुऊष आणि महिला एकेरीचे विजेते खेळाडू 2028  ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

Advertisement
Tags :

.