For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशमध्ये भारतीयाला गुप्तहेरीच्या संशयाने अटक

06:43 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशमध्ये भारतीयाला गुप्तहेरीच्या संशयाने अटक
Advertisement

पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेश सरकारने 44 वर्षीय भारतीय नागरिक रबीबुल इस्लाम याला भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले आहे. इस्लाम याच्यावर शासकीय गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर एका परदेशी गुप्तचर संस्थेशी संपर्क ठेवल्याचा आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. रबीबुल इस्लाम हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 44 वर्षीय रबीबुल इस्लाम गेल्या आठवड्यात ढाका येथे संशयास्पद हालचाली करताना    पकडला गेला होता. बांगलादेशच्या ढाका महानगर पोलिसांनी इस्लामविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तूर्तास रबीबुल इस्लामला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इस्लामने महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांचे फोटो काढून ते परदेशी गुप्तचर संस्थांना पाठवले, असा बांगलादेशी गुप्तहेर संस्थांचा दावा आहे.

बांगलादेश पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यात रबीबुल इस्लाम हा भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. तथापि, त्याच्या पासपोर्टवर त्याचे जन्मस्थान सौदी अरेबियातील रियाध असे नमूद आहे. रबीबुल इस्लाम हा पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिह्यातील गौरीभोज गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. सीमेवरील अवैध घुसखोरीवरून भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने ही अटक केली आहे. चौकशीदरम्यान, रबीबुल इस्लामने गेल्या 12 वर्षांत पर्यटक किंवा व्यावसायिक व्हिसा वापरून अनेकवेळा  बांगलादेशला भेट दिल्याचे म्हटले आहे.

रबीबुल इस्लामवर हेरगिरीचा आरोप

या प्रकरणात रबीबुल इस्लामने व्यावसायिक कामाच्या नावाखाली हेरगिरी केली आणि तो एका परदेशी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता, असा आरोप बांगलादेश पोलिसांनी केला आहे. रबीबुल इस्लामने परदेशी गुप्तचर संस्थांना माहिती देखील पुरवली. बांगलादेशी तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, इस्लाम 14 सप्टेंबर रोजी भोमरा भू-बंदरमार्गे बांगलादेशात दाखल झाला आणि त्याला 22 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

Advertisement
Tags :

.