For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत महिला संघाला दंड

06:31 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत महिला संघाला दंड
Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्टेलियाविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखता आल्याने भारताला त्यांच्या सामना मानधनाच्या पाच टक्के दंड करण्यात आला आहे.

रविवारी ऑस्टेलियाने विक्रमी पाठलाग करीत हायस्कोअरिंगचा सामना तीन गड्यांनी जिंकला. भारताचा पुढील सामना रविवारी इंदूर येथे इंग्लंडविरुद्ध होणार आहे आणि तो जिंकणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत भारताने एक षटक कमी टाकल्याचे दिसून आल्याने त्यांच्या सामना मानधनातील पाच टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे, असे आयसीसी मॅच रेफरी पॅनेलच्या मिचेल परेरा यांनी सांगितले. कर्णधार हरमनप्रीत कौरने गुन्हा व दंड मान्य केल्याने त्याची औपचारिक सुनावणी घेण्यात आली नाही.

Advertisement

वेळेच्या भत्ते विचारात घेतल्यांनतर भारत लक्ष्यापेक्षा एक षटक कमी असल्याने आढळून आल्याने एमिरेटस आयसीसी इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजचे मिशेल पेरेरा यांनी हा दंड ठोठावला असे आयसीसीयाने एका निवेदानात म्हटले आहे.खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार जे किमान ओव्हर - रेट गुन्हांशी संबंधित आहे, खेळाडूंना त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत टाकले नाही अशा प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या पाच टक्के दंड आकारला जातो. आयसीसीने म्हटले आहे की भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने दंड स्वीकारताना गुन्हाची कबुली दिली आहे आणि औपचारिक सुनावणीची आवश्यकता नाही. मैदानावरील पंच स्यू रेडफर्न आणि निमाली परेरा, तिसरे पंच जॅकलिन विल्यम्स यांनी आरोप निश्चित केले होते, असे  आयसीसीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.