For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन रौप्यपदके

06:58 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन रौप्यपदके
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

वृत्तसंस्था, ग्लास्गो

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकविले तर पुरुषांच्या 65 किलो वजन गटात राजा मुथुपंडीने भारताला आणखी एक रौप्यपदक मिळवून दिले.

Advertisement

ज्ञानेश्वरीने एकूण 199 किलो वजन उचलून (स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो) रौप्यपदक जिंकले. नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला दिदिह (206 किलो) हिने सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडाच्या रेबेका ग्रौलक्स (178 किलो) हिने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये मुथुपंडीने रौप्य, मलेशियाच्या अझनील बिदिनने सुवर्ण (299 किलो) आणि पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारूने कांस्यपदक (282 किलो) जिंकले. मुथुपंडीची एकूण कामगिरी 286 किलो इतकी होती, यामध्ये ‘स्नॅच‘ प्रकारात 126 किलो आणि ‘क्लीन‘ प्रकारात 160 किलो वजनाची उचल केली. भारताच्या ऋषिकांत सिंग (रौप्य), मीराबाई चानू (सुवर्ण) आणि राजा मुथुपंडी (रौप्य) यांच्यानंतरची चौथी भारतीय वेटलिफ्टर ज्ञानेश्वरीने रौप्यपदक पटकाविले.

लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी एम. श्रीशंकर पात्र

एम. श्रीशंकरने ‘ऑटोमॅटिक क्वालिफायिंग‘ निकष पूर्ण करून पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली, तर लोकेश सत्यनाथनने सर्वोत्तम 12 खेळाडूंमध्ये स्थान मिळवून पुढील फेरी गाठली.

गुरिंदरवीर सिंगची निराशाजनक कामगिरी

भारताचा सर्वात वेगवान धावपटू गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत 10.39 सेकंदांची निराशाजनक वेळ नोंदवल्यामुळे तो हीटमध्ये एकूण 28 व्या स्थानावर राहिला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.

सचिन सिवाच उपांत्यपूर्व फेरीत दाखल

माजी विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने मुष्टियुद्धाच्या पुरुषांच्या 60 किलो वजनगटात इंग्लंडच्या विल्यम ह्युइटला 4-1 गुणांच्या निर्णयाने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वेटलिफ्टर्सचे कौतुक

पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात व महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय वेटलिफ्टर राजा मुथुपंडी व ज्ञानेश्वरी यादव यांचे अभिनंदन केले. भारताच्या पदकांच्या वाढत्या संख्येत आणखी एका पदकाची भर घातल्याबद्दल त्याचे कौतुक केले.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुथुपंडीला 30 लाख रुपयांचे बक्षीस

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या राजा मुथुपंडीसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांनी त्याचे कौतुक करून त्याचे हे यश राज्यातील युवकांना प्रेरणा देणारे ठरेल, असे ते म्हणाले.

गुरिंदरवीर सिंग

पात्रतेचा निकष 8 मीटर किंवा किमान 12 सर्वोत्तम कामगिरी करण्राया खेळाडूंचा ठेवण्यात आला आहे.

गट ‘अ‘ मधून थेट पात्रता मिळवणारा तो 27 वर्षीय खेळाडू एकमेव होता, तर इतर पाच जणांनी सर्वोत्तम 12 कामगिरी करण्राया खेळाडूंमध्ये स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताचा सर्वात वेगवान धावपटू गुरिंदरवीर सिंग राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत 10.39 सेकंदांची निराशाजनक वेळ नोंदवल्यामुळे तो हीटमध्ये एकूण 28 व्या स्थानावर राहिला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. 10 सेकंदांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने ग्लासगोमध्ये आलेल्या या 25 वर्षीय खेळाडूची कामगिरी त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूपच कमी होती. हीट 4 मध्ये पाचव्या लेनमध्ये असलेल्या गुरिंदरवीरने 10.39 सेकंदांची वेळ नोंदवून आपल्या हीटमध्ये दुसरे स्थान पटकावले, परंतु तो एकूण 28 व्या स्थानावर राहिला आणि पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

सचिन सिवाच पुरुष 60 किलो बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल, राष्ट्रकुल पदकापासून फक्त एक विजय दूर. माजी विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने सोमवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष 60 किलो बॉक्सिंग स्पर्धेच्या 16 च्या फेरीत इंग्लंडच्या विल्यम ह्युइटला 4-1 गुणांच्या निर्णयाने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या 26 वर्षीय भारतीय खेळाडूने इंग्लिश बॉक्सरविरुद्ध संयमी कामगिरी केली आणि पाचपैकी चार पंचांचे गुणफलक जिंकले. पंच 1, 2, 3 आणि 5 यांनी सचिनला 29-27

Advertisement
Tags :

.