For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई यू-20 अॅथलेटि रिलेत भारताला सुवर्ण, कांस्यपदक

06:38 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई यू 20 अॅथलेटि रिलेत भारताला सुवर्ण  कांस्यपदक
Advertisement

वैयक्तिक स्पर्धेत वेंकटरामला सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ हाँगकाँग

यू-20 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम दिनी भारताच्या महिला व पुरुष रिले संघाने अतुलनीय कामगिरी करत सुवर्णपदक व कांस्यपदकाची कमाई केली तर वैयक्तिक अॅथलेटिक्स स्पर्धेत वेंकटराम रे•ाrला सुवर्ण तर मुस्काननेही सुवर्णपदक तर निश्चय यांने पुरुषांच्या थाळीफेक रौप्यपदक पटकविले.

Advertisement

या स्पर्धेत भारताने सुवर्ण तर कझाकस्तानाने 3.43.63 वेळेसह रौप्यपदक पटकविले. यजमान हाँगकागँने 3.49.94 वेळेसह कांस्यपदक मिळवले. हाँगकाँग येथे सुरु असलेल्या आशियाई यू-20 अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप भारताने आणखी एका सुवर्णपदकासह केला.

रविवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताच्या 4×400 मिटर महिला रिले संघाने स्पर्धाविक्रम प्रस्थापित केला. भूमिका नेहाते, ताहुरा खातून, सेहनूर बावा आणि नीरु पाठक या चौघींच्या संघाने 3.38.07 अशी वेळ नोंदवत कझाकस्तानाला मागे टाकले. कझाकस्तानने 3.43.63 वेळेसह रौप्य तर यजमान हाँगकागँने 3.49.94 वेळेसह कांस्यपदक मिळवले. त्यानंतर लगेचच भारताने पुरुषांच्या रिले शर्यतीत आणखी एका पदकाची भर घातली. पीयूष राज, सय्यद साबिर, रणजित कुमार एस आणि मोहम्मद अश्फाक यांचा समावेश असलेल्या पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाने 3.05.54 वेळेसह कांस्यपदक जिंकले. चीनने 3.04.88 वेळेसह सुवर्णपदक तर कतारच्या संघाने 3.05.06 वेळेसह रौप्य मिळविले.

त्याआधी दिवसाच्या सुरुवातीला वेंकटराम रे•ाr मोगलीने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत 1.48.27 अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तसेच मुस्कान हिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत 16:53.08 वेळेसह सुवर्ण घेतले तर निश्चयने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत 60.10 मीटर अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. या खंडीय कनिष्ठ स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम दिवशी मिळालेल्या या पदकांमुळे भारतीय संघाच्या या संपूर्ण मोहिमेचा अत्यंत दमदार आणि यशस्वी समारोप झाला.

Advertisement
Tags :

.