विश्व चषक तिरंदाजीत भारताला चार पदके
वृत्तसंस्था / अबुमिडेली (अमेरिका)
रविवारी येथे झालेल्या विश्व चषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चार पदकांची कामई केली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या धिरज बोमादेवराने वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात कांस्य पदक मिळविले.
भारतीय सेनादलातील 23 वर्षीय तिरंदाजपटू धिरजने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात स्पेनच्या अॅन्ड्रेस मिडेलचा 6-4 अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकाविले. तत्पूर्वी भारताच्या तिरंदाजपटूंनी सांघिक रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक मिळविले. तरुणदीप राय, अतेनु दास आणि धिरज यांनी या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. सुवर्णपदकासह झालेल्या लढतीत चीनने भारताचा 5-1 असा पराभव करत पहिले स्थान पटकाविले. भारताच्या अभिषेक वर्माचे पुरुष वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील पदक थोडक्यात हुकले. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.