For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थॉमस चषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक

06:36 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
थॉमस चषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक
Advertisement

फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत : भारताची उपांत्य फेरीत हार 

Advertisement

वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)

2026 च्या थॉमस चषक सांघिक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

भारतीय बॅडमिंटन संघाने 2022 साली थॉमस चषक पटकाविला होता. मात्र यावेळी त्यांचे जेतेपदाचे स्वप्न उपांत्य फेरीतच समाप्त झाले. या उपांत्य लढतीत दुखापतग्रस्त लक्ष्य सेनची उणीव भारताला चांगलीच जाणवली. उपांत्य फेरीच्या लढतीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या चौथ्या मानांकित ख्रिस्टो पोपोव्हने भारताच्या आयुष शेट्टीचा 21-11, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केल्याने फ्रान्सने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या एकेरी सामन्यात फ्रान्सच्या दहाव्या मानांकित अॅलेक्स लॅनेरने भारताच्या अनुभवी किदांबी श्रीकांतचे आव्हान 21-16, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. या विजयामुळे फ्रान्सने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली. तिसऱ्या एकेरी सामन्यात फ्रान्सच्या टोमा ज्युनिअर पोपोव्हने भारताच्या एचएस प्रणॉयचा 21-19, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. भारताचे या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच फ्रान्सकडून 3-0 असे संपुष्टात आले. या स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल चिनी तैपेईचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

Advertisement
Tags :

.