कनिष्ठ विश्व सांघिक स्क्वॅश स्पर्धेत भारताला कांस्य
वृत्तसंस्था, ओन्टाfिरओ
येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्व स्क्वॅश सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरूष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या सांघिक स्क्वॅशच्या उपांत्य लढतीत अमेरिकेने भारताचा 2-0 असा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय पुरूष संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच या स्पर्धेत महिलांच्या सांघिक प्रकारात अमेरिकेने भारताचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील पुरूषांच्या उपांत्य लढतीत भारताच्या गुरवीर सिंगने अमेरिकन स्पर्धकाचा पहिला सामन्यात 11-7, 9-11, 6-11, 11-7, 11-3 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या यासिन सेलबायने भारताच्या आर्यवीर दिवाणचा 11-5, 11-4, 11-5 असा पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पुरूष संघाने पाठोपाठ कांस्यपदके मिळविण्याचा विक्रम केला